नववर्षात झारखंड सरकारचे नागरिकांना मोठे गिफ्ट, पेट्रोल होणार 25 रुपयांनी स्वस्त
झारखंड सरकारकडून नववर्षाच्या तोंडावरच तेथील नागरिकांना मोठे गिप्ट देण्यात आले आहे. सरकारने राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. झारखंड सरकारच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रांची : झारखंड सरकारकडून नववर्षाच्या तोंडावरच तेथील नागरिकांना मोठे गिप्ट देण्यात आले आहे. सरकारने राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. झारखंड सरकारच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंड मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटवरून याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या योजनेचा फायदा हा केवळ दुचाकी चालकांनाच होणार आहे.
कोणाला होणार फायदा?
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारने पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा हा सामान्य मानसाला होणार आहे. नवे दर हे येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहेत. सध्या झारखंडमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 98.52 आहेत. त्यामध्ये 25 रुपयांची कपात केल्यास पेट्रोल प्रति लिटर 73 रुपयांवर येणार आहे. मात्र जे दुचाकीधारक आहेत, त्यांनाच सरकारच्या या योजनेचा फायदा मिळणार आहे. असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
दरम्यान एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल,डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे सामान्य माणलासा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशातच पेट्रोल तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सामान्य नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. यापूर्वी चार नोव्हेंबरला केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात केली होती. उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे प्रति लिटर 5 व 10 रुपयांनी कमी झाले होते. केंद्रापाठोपाठ पंजाब, उत्तरप्रदेश या सारख्या राज्यांनी देखील इंधनाचे दर कमी केले होते. आता झारखड सरकारकडून देखील पेट्रोलचे दर कमी करण्यात आले आहेत. दरम्यान सध्या झारखंड सरकारकडून पेट्रोलवर प्रति लिटर 17.2 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत आहे. पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्थ केल्यास पेट्रोलवरील संपूर्ण कर सरकारला माफ करावा लागणार आहे. त्याचा मोठा आर्थिक ताण हा राज्याच्या तिजोरीवर येऊ शकतो.
पेट्रोल-डीजल के मूल्य में लगातार इजाफा हो रहा है, इससे गरीब और मध्यम वर्ग के लोग सबसे अधिक प्रभावित हैं। इसलिए सरकार ने राज्य स्तर से दुपहिया वाहन के लिए पेट्रोल पर प्रति लीटर ₹25 की राहत देगी, इसका लाभ 26 जनवरी 2022 से मिलना शुरू होगा:- श्री @HemantSorenJMM pic.twitter.com/MsinoGS60Y
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) December 29, 2021
संबंधित बातम्या
नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट: थकित रक्कम लवकरच वर्ग, महागाई भत्त्यांत वाढ!
ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज