Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI News on 2000 Note : मोठी बातमी! कशाला बँकेसमोर करता गर्दी, याठिकाणी पण बदलता येणार नोट

RBI News on 2000 Note : यापूर्वीचा नोटाबंदीचा नागरिकांना मोठा मनस्ताप झाला होता. पण यावेळी हा त्रास कमी करण्याचा आणि बँकांसमोरील लांबच लांब रांगा कमी करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे, काय आहे हा दिलासा...

RBI News on 2000 Note : मोठी बातमी! कशाला बँकेसमोर करता गर्दी, याठिकाणी पण बदलता येणार नोट
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:57 PM

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनाबाहेर करण्याची घोषणा केली. 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी अचानक ही घोषणा करण्यात आली. या 23 मेपासून नोटा बदलण्याची (2000 Rupees Note) धांदल सुरु होईल. बँकांसमोर पुन्हा नागरिकांची गर्दी होईल. त्यामुळे काही गुलाबी नोटांसाठी लांबच लांब रांगेत किती तास ताटकळायचं असा सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिक एकावेळी 2000 रुपयांच्या केवळ 10 नोट बदलवू शकता. गेल्यावेळी काळा पैसा काढण्यासाठी नोटबंदीचा फैसला झाला खरा पण त्यातून जनतेचा रोष उमटला. यंदा केंद्र सरकारने आणि केंद्रीय रिझर्व्ह बँक नागरिकांना दिलासा देणार आहे.

याठिकाणी व्यवस्था बँकेच्या व्यतिरिक्त ग्राहकांना नोटा बदलण्यासाठी आणखी एक व्यवस्था उपलब्ध आहे. बँकांनी आता त्यांचे बिझनेस कॉरेस्पॉन्डेंट सेंटरवर (Business Correspondents) नोटा बदलता येतील. ग्रामीण आणि शहरातील अनेक भागात बँकांनी सुविधेसाठी आणि बँकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हे व्यावसायिक सहायता केंद्र उभारली आहेत. 2006 मध्ये आरबीआयने केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली. ग्राहक आणि बँकांमध्ये मध्यस्थ म्हणून हे केंद्र काम करतात.

बँकेत जाण्याची गरज नाही 2000 रुपयांची नोट बदली करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या गावातील या मध्यस्थी केंद्रामार्फत गुलाबी नोट बदलवू शकता. ज्यांच्याकडे कमी नोटा आहेत, त्यांना 2000 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 4000 रुपये बदलविता येणार आहे. या मध्यस्थ केंद्रावर या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटा देण्यात येतील. अथवा तुमच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय बँकेने दिली माहिती केंद्रीय बँकेने ग्राहकांना बँकेत 2,000 रुपयांच्या नोटा बदलवून घेण्याच्या अथवा खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना विविध बँकांच्या कोणत्याही शाखांमधून 23 मे ते 30 सप्टेंबर या काळात नोट बदलवून मिळतील. संपूर्ण देशात आरबीआयचे एकूण 31 क्षेत्रीय कार्यालये आहेत.

127 दिवसांत बदला 26 लाख आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ही मर्यादा एका दिवशी 20 हजार रुपायांपर्यंत आहे. म्हणजे 127 दिवसांमध्ये नागरिकांना 25,40,000 रुपये जमा करता येतील.

बँक खात्याचे केवायसी करुन घ्या जर तुमच्याकडे 26 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असेल तर मग तुमच्याकडील बँक खात्याचे केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे. जर केवायसी अपडेट नसेल तर त्वरीत करुन घ्या. तुमच्या खात्यात तुम्ही किती पण पैसा जमा करु शकता. बँकेच्या नियमानुसार, जी रक्कम जमा करता येऊ शकते, तितकी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. पण भलीमोठी रक्कम जमा करताना, ही रक्कम कोणत्या माध्यमातून तुमच्याकडे आली. तिचा उत्पन्नाचा स्त्रोत काय याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. ज्यांच्याकडे बँकेचे खाते नाही. त्यांना 26 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बदलता येणार नाही.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.