Demat Account : मोठी बातमी! 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर डीमॅट खाते होईल फ्रीज

Demat Account : बाजार नियामक SEBI ने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार डीमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. नाही तर शेअरधारकांना बाजारात व्यवहार करताना अडचण येऊ शकते. काय आहे ही अडचण, कोणते काम करणे आवश्यक आहे.

Demat Account : मोठी बातमी! 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर डीमॅट खाते होईल फ्रीज
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 6:30 PM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : स्टॉक मार्केटमध्ये शेअरचे खरेदी-विक्री करणे अथवा तो जतन करण्यासाठी तो खात्यात कायम ठेवण्यासाठी डीमॅट खात्याची (Demat Account) अत्यंत आवश्यकता आहे. जर तुमच्याकडे पण डीमॅट खाते असेल तर तुम्हाला या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एक काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही हे काम पूर्ण नाही केले तर डीमॅट खाते हाताळणे अत्यंत अवघड होईल. यापूर्वी पण हे काम पूर्ण करण्यासाठी, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली आहे. पण आधार-पॅनकार्ड अथवा इतर कार्डच्या अनुभवावरुन बाजारा नियामक सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) गुंतवणूकदारांना अजून मुदतवाढ देईल असे वाटत नाही. त्यामुळे या महिन्याच्या आतच हे काम पूर्ण करुन घ्या.

वारसाचे जोडा नाव

शेअर बाजारात स्टॉक खरेदी-विक्रीसाठी डीमॅट खात्याची गरज असते. सेबीने डीमॅट खात्यात वारस जोडण्यासाठी यापूर्वी पण संधी दिली होती. तरीही अनेक शेअरधारकांनी, डीमॅट खातेदारांनी डीमॅट खात्यात वारसाची जोडणी केली नाही. वारस जोडण्यासाठी आता या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

हे सुद्धा वाचा

तर खाते होईल फ्रीज

जर डीमॅट खातेधारकांनी या निश्चित कालावधीत वारसाची (Demat Account Nomination)जोडणी केली नाही, तर खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बाजार नियामक सेबी अशा खातेधारकांचे खाते फ्रीज पण करु शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.

अनेकदा वाढवली अंतिम मुदत

बाजार नियामक सेबीने यापूर्वी पण डीमॅट खातेधारकांना नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी संधी दिली होती. पण अनेकदा ही डेडलाईन वाढविण्यात आली. पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च, 2023 रोजी संपली होती. परंतु, 27 मार्च रोजी सेबीने एक अधिसूचना काढली. त्यात वारसाचे नाव जोडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सेबीने गुंतवणूकदारांना एकूण 6 महिन्यांचा जादा वेळ दिला. यापुढे मुदत वाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर वारसाचे नाव जोडून घ्या.

डीमॅट खात्यात कसे जोडणार वारसाचे नाव

  1. डीमॅट खात्यात वारसाचे नाव जोडण्यासाठी खात्यात लॉगिन करा.
  2. यानंतर My Nominees या पर्यायावर प्रोफाईल सेक्शन निवडा.
  3. या पर्यायावर Add Nominee वा opt-out असा पर्याय दिसेल.
  4. त्यानंतर वारसाचा तपशील जोडा, त्याचे ओळखपत्र अपलोड करा.
  5. त्यानंतर नॉमिनीचा किती शेअर आहे, ते निवडा.
  6. ई-साईन करा आणि आधार ओटीपी नोंदवा.
  7. व्हेरिफिकेशनची प्रक्रिया 24 ते 48 तासात ही प्रक्रिया पूर्ण होईल.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.