Bitcoin च्या भावात घसरण सुरुचं, जगातील 10 क्रिप्टोकरन्सीचे दर वाचा एका क्लिक वर

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये (Bitcoin) च्या किमतीतमध्ये घसरण होत आहे.

Bitcoin च्या भावात घसरण सुरुचं, जगातील 10 क्रिप्टोकरन्सीचे दर वाचा एका क्लिक वर
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 12:10 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये (Bitcoin) च्या किमतीतमध्ये घसरण होत आहे. बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीच्या देखील किमती मोठ्या प्रमाणावर घसरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. एलन मस्कनं बिटकॉईन बद्दल केलेलं ट्विट आणि चीननं क्रिप्टोकरन्सीबाबत घेतलंलं धोरण घसरणीसाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. एका बिटकॉईनची किमत सध्या भारतीय चलनात 26.40 लाख तर अमेरिकन चलनामध्ये 35202 डॉलर इतकी आहे. 14 एप्रिलला बिटकॉईनची किमंत 64829 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 48.62 लाख रुपये इतकी होती. म्हणजेत बिटकॉईनला गेल्या महिनाभरामध्ये मोठा फटका बसला आहे. बिटकॉईनच्या भावात 47 टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. (Bitcoin Price today price of bitcoin down day by day after china decision on Crypto Currency)

चीनचा नेमका निर्णय काय?

चीनमधील तीन सरकारी संघटना नॅशनल इंटरनेट फाइनान्स असोसिएशन ऑफ चायना, चायना बँकिंग असोसिएशन आणि पेमेंट अँड क्लिअरिंग असोसिएशन ऑफ चायना ने ने सोशल मीडियावर त्यांच्या नागरीकांना चेतावणी दिली होती. क्रिप्टो करन्सी व्यवहारांमध्ये कोणताही तोटा झाल्यास चीनच्या वित्तीय संस्था त्या पैशांविषयी संरक्षणाची भूमिका घेणार नाही. यानंतर क्रिप्टोकरन्सीमधील घसरणीला सुरवात झाली.

प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांनी देखील पर्यावरणाच्या मुद्यावरुन टेस्ला कंपनीची कार खरेदी करताना बिटकॉईन स्वीकारणार नसल्याचं म्हटंल. त्यामुळे देखील बिटकॉईनच्या भावात घसरण सुरु झाली होती.

क्रिप्टोकरन्सीचं 24 मे सकाळी 8.40 मिनिटांनी मूल्य काय होत?
क्रिप्टोकरन्सीअमेरिकन चलनातील मूल्य भारतीय चलनातील मूल्य
बिटकॉईन (Bitcoin) $35,20226.40 लाख रुपये
इथेरेरम: Ethereum: $2,184.76 1 लाख 59 हजार रुपये
टेदर: Tether $1 73 रुपये रुपये
बियान्स कॉईन Binance Coin $274.6220 हजार रुपये
कार्डानो Cardano $1.38 100 रुपये रुपये
डोजेकॉईन Dogecoin: $0.3065 22 रुपये
एक्सआरपी XRP $0.8023 58 रुपये
पोल्कडॉट Polkadot: $18.53, 1350 रुपये
इंटरनेट कॉम्प्यूटर Internet Computer $144.10 10503 रुपये

क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2018 मध्ये भारतातील बँकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंचसाठी करु नये, असे निर्देश दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टानं मार्च 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता. यानंतर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज साठी बँकिंग सपोर्टचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या गेल्या काही दिवसांमधील रिपोर्टनुसार आरबीआय़ क्रिप्टोकरन्सीसाठी बँकिग सेवा देण्यास मनाई करत आहे.

संबंधित बातम्या:

Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…

(Bitcoin Price today price of bitcoin down day by day after china decision on Crypto Currency)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.