आयटी सेक्टरला बुस्टर? या दोन बलाढ्य कंपन्यांची अशी राहिल कामगिरी… ब्रोकिंग कंपन्यांचा अंदाज

टीसीएस आणि इन्फोसिस या देशातील बलाढ्य आयटी कंपन्या आहेत. आयटी सेक्टरमध्ये या कंपन्यांचे शेअर्सची किंमतदेखील त्यांच्या नावाला शोभेल अशीच आहे. या कंपन्या बहुतेक इक्विटी एफएम स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहे. तुम्ही आयटी सेक्टरमध्ये शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर, गुंतवणूक धोरणात या शेअर्सचा समावेश करु शकतात. जाणून घ्या पुढील काळात या कंपन्याची कामगिरी कशी राहिल ते..

आयटी सेक्टरला बुस्टर? या दोन बलाढ्य कंपन्यांची अशी राहिल कामगिरी... ब्रोकिंग कंपन्यांचा अंदाज
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 2:35 PM

चौथ्या तिमाहीच्या निकालांचे वेध लागले आहेत. दरवेळीप्रमाणेच यंदाही आयटी क्षेत्रातील दिग्गजांनी पहिल्या फेरीत आपले निकाल जाहीर केले आहेत. टीसीएस आणि इन्फोसिसच्या (TCS and Infosys) निकालांना गूंतवणूकदारांकडून सकारात्मकृदृष्ट्या बघितले जात आहे. यासोबतच आयटी क्षेत्राची (IT sector) पुढील वाटचाल तसेच ध्येय धोरणेदेखील मजबूत मानली जात आहे. या कारणास्तव अनेक ब्रोकिंग कंपन्यांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आयटी सेक्टरमधील दोन बलाढ्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Stock) वाढ होण्याचा अंदाज ब्रोकिंग कंपन्यांकडून वर्तविण्यात आला आहे. यात प्रामुख्याने टीसीएस व इंफोसिसचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आघाडीच्या ब्रोकिंग कंपन्यांनीही आपले काही निकष गुंतवणूकदारांसमोर ठेवले आहेत.

काय आहे अंदाज?

एका अंदाजानुसार, आगामी काळात ब्रोकिंग कंपन्या आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सबाबत त्यांचे लक्ष्य बदलू शकतात. टीसीएस आणि इंफोसिस या देशातील सर्वात मोठ्या शेअर्सची किंमत असणार्या कंपन्यांपैकी एक आहेत. आणि त्या बहुतेक इक्विटी एफएम स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहेत. भविष्यात या दोन्ही आयटी सेक्टमधील बलाढ्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास गुंतवणूकदारांना याचा चांगला फायदा मिळण्याची शक्यता ब्रोकिंग कंपन्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सीमध्ये आनंद राठी 4350, शेअरखान 4600, येस सिक्युरिटीज 4336, आणि प्रभूदास लिलाधर यांनी 4221 च्या गुंतवणुकीचे एक वर्षाचे उद्दिष्ट दिले आहे, या कंपनीचे शेअर्स सध्या 3661 च्या पातळीवर आहे. म्हणजेच, येथून किमान 15 टक्के आणि जास्तीत जास्त 26 टक्के यात वाढ शक्य आहे. शेअरखान यांनी या स्टॉकचा सर्वाधिक अंदाज दिला आहे. ब्रोकिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, टीसीएसने चौथ्या तिमाहीत जोरदार निकाल दिला आहे. कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा थोडा चांगला आहे. कंपनीचे नवीन सौदे विक्रमी पातळीवर आहेत. ब्रोकिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन आर्थिक वर्षात कंपनीची वाढ दुहेरी अंकांमध्ये राहील.

इन्फोसिस

या कंपनीत, एमके ग्लोबल 1970, मोतीलाल ओसवालने 2000, शेअरखान यांनी इन्फोसिसमध्ये 2150 च्या लक्ष्यासह गुंतवणूक सल्ला दिला आहे. कंपनीचा सध्याचा शेअर 1748 च्या घरात आहे. म्हणजेच, या शेअरमध्ये किमान 13 टक्के आणि जास्तीत जास्त 23 टक्के वाढ अपेक्षीत मानली जात आहे. मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये इन्फोसिसचे तिमाहीतील निकाल कमजोर असल्याचे लिहिले आहे. कंपनीची वाढ अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. परंतु असे असले तरी भविष्यात कंपनी व्यवस्थापनाने डील पाइपलाइन खूप मजबूत असल्याचे संकेत दिले आहेत.

GT vs CSK IPL 2022: MS Dhoni ला कधी लेगस्पिन गोलंदाजी करताना पाहिलय का? Watch VIDEO

6.67 इंचांचा डिस्प्ले, 5000mAh बॅटरीसह Infinix चा बजेट फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

VIDEO : 25 Fast News | 1 PM | 25 महत्वाच्या बातम्या | 17 April 2022

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.