Income Tax Return : CA विना फाईल करा ITR, असे भरा ऑनलाईन रिटर्न

Income Tax Return : ITR भरण्याची मुदत आता जवळ आल्याने अनेक जण चूक होऊ नये यासाठी काळजी घेतात. ते सीए ला गाठतात. त्याच्याकडून आयटी रिटर्न भरुन घेतात. काळजी घेतल्यास तुम्ही पण ऑनलाईन आयटीआर सहज भरु शकता.

Income Tax Return : CA विना फाईल करा ITR, असे भरा ऑनलाईन रिटर्न
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 6:13 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशातील सर्व करदात्यांना आयटी रिटर्न (Income Tax Return) भरणे आवश्यक आहे. यासंबंधीची मुदत निश्चित करण्यात आली आहे. 31 जुलै 2023 रोजीपर्यंत इनकम टॅक्स फाईल करणे आवश्यक आहे. आयटीआर फाईल (ITR File) करण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात येणार नाही. जर ही डेडलाईन चुकली तरीही तुम्हाला आयटीआर फाईल करता येईल. पण त्यावेळी दंडाची रक्कम भरावी लागेल. ITR भरण्याची मुदत आता जवळ आल्याने अनेक जण चूक होऊ नये यासाठी काळजी घेतात. ते सीए ला गाठतात. त्याच्याकडून आयटी रिटर्न भरुन घेतात. काळजी घेतल्यास तुम्ही पण ऑनलाईन आयटीआर सहज भरु शकता.

Form 16 आवश्यक तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहे, तिच्याकडून फॉर्म 16 घ्या. कंपनीने अद्याप फॉर्म 16 दिला नसेल तर तुम्हाला घाई करणे आवश्यक आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी फॉर्म 16 ची आवश्यकता आहे. लवकरात लवकर आयटीआर फाईल करणे तुम्हाला गरजेचे आहे. नाहीतर गडबडीत जास्त चुका होऊ शकतात आणि मग हा सर्व द्रविडी प्राणायाम कसल्याचा उपयोगाचा ठरत नाही.

असे करा आयटीआर फाईल तुम्ही ई-फाईलिंग पोर्टल अथवा चार्टर अकाऊटंट यांच्या माध्यमातून आयटीआर फाईल करु शकता. तुम्हाला सीए विना आयटीआर फाईल करायचा असेल तर तुम्हाला आयकर खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. याठिकाणी तुम्ही ऑनलाईन आयटीआर फाईल करु शकता.

हे सुद्धा वाचा
  • अशी आहे सोपी प्रक्रिया आयटीआर फाईल करण्यासाठी सर्वात अगोदर इनकम टॅक्सच्या ई-फाईलिंग पोर्टलवर जा
  • तुमचा युझर आयडी (पॅनकार्ड), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा
  • e-file मेन्यूवर क्लिक करा. इनकम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा
  • उत्पन्नाआधारे योग्य आयकर रिटर्न फॉर्म पर्याय निवडा
  • वेतनदार असाल तर Form 16 जवळ ठेवा.
  • Form 16 आधारे आयटीआर-1, आयटीआर-2 यापैकी एक पर्याय निवडा
  • मुल्यांकन वर्ष (Assessment Year) निवडा. सध्या मुल्यांकन वर्ष 2023-24 साठी पर्याय निवडता येईल
  • बारकाईने सर्व अर्ज भरा. योग्य माहिती जमा केली की नाही, ते एकदा तपासा

या कागदपत्रांची गरज

  • फॉर्म 16
  • फॉर्म 16 ए
  • फॉर्म 26 एएस
  • कॅपिटल गेन स्टेटमेंट
  • टॅक्स सेव्हिंग इन्वेस्टमेंट प्रुफ

फॉर्म करा डाऊनलोड प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही आयकर विभागाच्या संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.