सणासुदीच्या काळात कॅनरा बँकेची ग्राहकांना खास भेट; कर्ज झाले स्वस्त
Canara bank | जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा बँकेकडून आकारल्या जाणाऱ्या किमान व्याजाला आधार दर म्हणतात. बँक कोणालाही आधार दरापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. या बेस रेटच्या जागी आता बँका MCLR वापरत आहेत. त्याची गणना किरकोळ खर्च निधी, टर्म प्रीमियम, ऑपरेटिंग खर्च आणि रोख राखीव गुणोत्तर राखण्याच्या खर्चाच्या आधारे केली जाते.
मुंबई: सणासुदीच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कॅनरा बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. नवे दर 7 ऑक्टोबरपासून लागू होतील. एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.55 टक्के करण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले. त्यामुळे पर्सनल लोन, ऑटो लोन आणि होम लोन स्वस्त झाले आहे
एका वर्षाच्या कालावधीसाठी, एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी कमी करून 7.25 टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या गृहकर्ज आणि कार कर्ज ग्राहकांना दिलासा मिळेल. 6 ऑक्टोबरपासून डीसीबी बँकेने आपल्या एमसीएलआरमध्ये 0.05 टक्के कपात केली आहे.
MCLR म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा बँकेकडून आकारल्या जाणाऱ्या किमान व्याजाला आधार दर म्हणतात. बँक कोणालाही आधार दरापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. या बेस रेटच्या जागी आता बँका MCLR वापरत आहेत. त्याची गणना किरकोळ खर्च निधी, टर्म प्रीमियम, ऑपरेटिंग खर्च आणि रोख राखीव गुणोत्तर राखण्याच्या खर्चाच्या आधारे केली जाते.
अन्य बँकांकडूनही खास ऑफर
देशातील मोठ्या बँकांमध्ये स्टेट बँक (SBI), ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि येस बँक होम लोनवर आकर्षक ऑफर देत आहेत. या सर्व बँका गृहकर्जाच्या व्याज दरावर मोठी सूट देत आहेत. स्टेट बँकेने प्रथमच क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन जाहीर केले आहे, जे 6.70 टक्के दराने दिले जात आहे. कर्जाच्या रकमेची पर्वा न करता, व्याज दर 6.70 टक्के निश्चित केला आहे. यापूर्वी ज्या ग्राहकांनी 75 लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्ज घेतले होते त्यांना 7.15 टक्के व्याज भरावे लागत होते. आता हाच व्याजदर 6.70 टक्के इतका झाला आहे.
पीएनबीने 50 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या गृहकर्जावरील व्याजदर 50 बेसिस पॉईंटने कमी केले आहेत. आता गृहकर्जावर 6.60 टक्के व्याज आकारले जात आहे. व्याज दरावर कमाल मर्यादा नाही. म्हणजेच कर्ज कितीही लाखांचे असले तरी व्याज समान असेल. बँक ऑफ बडोदा (बँक ऑफ बडोदा, BoB) गृहकर्ज 8.10 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. हे कर्ज घर खरेदी करण्यासाठी, प्लॉट खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते. बँक ऑफ बडोदा ने गृह कर्जाचा व्याजदर 8.10 टक्क्यांपासून सुरू केला आहे. या कर्जाचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढवता येतो.
संबंधित बातम्या:
RD Interest Rates: रिकरिंग डिपॉझिट खाते उघडायचेय, जाणून घ्या बँका आणि पोस्टाचा व्याजदर
LIC च्या ‘या’ योजनेत 1 कोटीचा फायदा, 4 वर्ष कमी भरावा लागणार प्रीमियम, जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! सरकारकडून ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी GPF व्याजदर जाहीर, नफा किती?