AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशाभूल करणाऱ्या Ads ना दणका, Sensodyne जाहिरात बंद, Naaptol ला भरभक्कम दंड

दिशाभूल जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकृष्ट करुन त्यांना फसविणा-या Sensodyne आणि Naaptol चे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कान उपटले आहे. अनुचित व्यापार प्रथा दोन्ही उत्पादकांना भोवली आहे. सीसीपीएने नापतोलला दहा लाखांचा दंड ठोठावला तर सेन्सोडाईनला सात दिवसांत त्यांची जाहिरात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिशाभूल करणाऱ्या Ads ना दणका, Sensodyne जाहिरात बंद, Naaptol ला भरभक्कम दंड
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 8:13 AM

नवी दिल्ली : भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात. त्याविरोधात आवाज उठवल्यावर अशा उत्पादकांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येतो. ग्राहकांना आमिष दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्यात येतो. फसवणूक होऊनही ग्राहक साधी तक्रार करत नसल्याने अशा कंपन्यांचे फावते. पण प्रत्येक वेळी असा फंडा कामी येत नाही. दिशाभूल जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकृष्ट करुन त्यांना फसवणाऱ्या Sensodyne आणि Naaptol चे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (ccpa) कान उपटले आहे. अनुचित व्यापार प्रथा दोन्ही उत्पादकांना भोवली आहे. सीसीपीएने नापतोलला दहा लाखांचा दंड ठोठावला तर सेन्सोडाईन उत्पादन करणा-या ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडला (GlaxoSmithKline (GSK) Consumer Healthcare Ltd) सात दिवसांत त्यांची जाहिरात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सेन्सोडाईन टुथपेस्टला जगभरातील दंतवैद्यांनी मान्यता दिल्याचा दावा सदर जाहिरातीत करण्यात आला होता. तर दुसरीकडे नापतोलच्या जाहिराती या दिशाभूल करणा-या असल्याने, त्यांनी अनुचित व्यापार पद्धतींचा वापर केल्याने या ऑनलाईन विक्रेत्याला (Naaptol Online Shopping Limited) दणका दिला.

वाढत्या तक्रारी लक्षात घेत स्वतः केली कारवाई

अशा जाहिरातींबद्दल लोकांच्या मनात कुतुहल असले तरी, फेकाफेकी करणा-या जाहिरातींविरोधात ग्राहक नाराजीचा सूर आळवतातच. अशा प्रकरणांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (ccpa) स्वतःहून दखल घेतली आणि निकाल दिला. सीसीपीएने जीएसकेला आदेश निघाल्यानंतर सात दिवसांच्या आत देशभरातील सर्व जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 2 (28) अन्वये Sensodyne Toothpaste ची जाहिरात ही ‘दिशाभूल करणारी जाहिरात’ मानली गेली आहे. सीसीपीएने महासंचालकांना (Investigation) 15 दिवसांत ‘रेकमेंडेड बाय डेंटिस्ट वर्ल्डवाइड’, ‘वर्ल्ड्स नंबर १ सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट’ या दाव्यांची खातरजमा करण्यास सांगितले आहे.

काय कंपनीचे म्हणणेः

जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअरच्या प्रवक्त्याने (GSK Consumer Healthcare) सांगितले की, ” त्यांना सीसीपीएचे आदेश मिळाले आहेत. आमची जाहीरात संबंधित कायदे आणि उद्योग मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत आहे, हे आम्ही स्पष्ट करतो. आम्ही जबाबदार कंपनी असून नियमांचे पालन करतो. आम्ही कर्मचा-यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत.’

नापतोलला दंड

सीसीपीए नापतोल ऑनलाइन शॉपिंगनेही लिमिटेडला ही भ्रामक जाहिरातींचे प्रसारण केल्याबद्दल दणका दिला आहे. नापतोलला सीसीपीएने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे, पीटीआयने याविषयी वृत्त दिले आहे. प्राधिकरणाने ‘सेट ऑफ २ गोल्ड ज्वेलरी’, ‘मॅग्नेटिक नी स्पोर्ट’ आणि ‘अॅक्युप्रेशर योग स्लीपर्स’च्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगत नापतोलला या जाहिराती त्वरीत बंद करण्यास सांगतिले आहे.

संबंधित बातम्या :

 जाहिरातीत चुकीची माहिती दाखवल्या प्रकरणी अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात तक्रार दाखल

भोज थाळी पडली चक्क 90 हजार रुपयांना! फेसबुकवरच्या जाहिरातीला भूलला अन् जाळ्यात अडकला

अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ‘कमला पसंद’ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नेमके प्रकरण काय?

बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....