काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (EXCISE DUTY) कमी करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं अर्थ मंत्रालयासोबत या मुद्द्यांवर बैठकांचे सत्र हाती घेतलं आहे.

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु
पेट्रोल डिझेलचे आजचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 9:53 PM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे वाढत्या दरामुळं (PETROL-DISEL RATE) सर्वसामान्यांच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे. जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार वाढत्या दरवाढीवरुन होणारा जनतेचा रोष कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वृत्त आहे. बिझनेस टुडे टीव्हीने सूत्रांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तात केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (EXCISE DUTY) कमी करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं अर्थ मंत्रालयासोबत या मुद्द्यांवर बैठकांचे सत्र हाती घेतलं आहे. सकारात्मक निर्णय झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या भाव कमी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्काला कात्री लावली होती. त्यावेळी केंद्र सरकारने (CENTRAL GOVERNMENT) पेट्रोल प्रति लीटर पाच रुपये आणि डिझेल प्रति लीटर दहा रुपये भावाने कपात केले होते.

…तर, किंमती आवाक्यात!

सध्या पेट्रोलवर उत्पादन शुल्क 27.90 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 21.80 रुपये प्रति लीटर आहे. केंद्रानं उत्पादन शुल्काला कात्री लावल्यास इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता वाढीस लागली आहे.

प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती-

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडील (आयओसीएल) उपलब्ध माहितीनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोलचे भाव 105.41 रुपये प्रति लीटर आहेत. डिझेलचे भाव प्रति लीटर 96.67 रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 120.51 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे भाव 104.77 रुपये प्रति लीटर आहेत.

‘या’ राज्यात शंभरीपार पेट्रोल:

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीपार पोहचले आहे. मुंबईत पेट्रोलच्या सर्वाधिक किंमती आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईट वर देखील पेट्रोलच्या किंमती उपलब्घ आहेत. RSP आणि आपल्या शहराचे नाव लिहून 9224992249 नंबर वर मेसेज केल्यास किंमती कळतात.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे घटक-

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि दर एकत्रित केल्यानंतर भाव ठरतो.

संबंधित बातम्या :

24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं

‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांना झटका; वैयक्तिक, वाहन, गृहकर्ज महागणार!

PENNY STOCKS : 5 वर्षात लाखाचे 94 लाख, 6 रुपयांच्या गुंतवणुकीवर 9300 टक्के रिटर्न

पाहा महत्त्वाची बातमी :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.