Bank opening time : आजपासून बँकेच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका
आजपासून बँक सुरू होण्याच्या वेळेत (Bank opening time) बदल होणार आहे. आज दिनांक 18 एप्रिल 2022 पासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहेत. पूर्वी त्या दहा वाजेपासून सुरू होत होत्या. म्हणजेच आता बँका दररोज एक तास आधी सुरू होणार आहेत.
नवी दिल्ली : सोमवारपासून बँक सुरू होण्याच्या वेळेत (Bank opening time) बदल होणार आहे. आजपासून दिनांक 18 एप्रिल 2022 पासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहेत. पूर्वी त्या दहा वाजेपासून सुरू होत होत्या. म्हणजेच आता बँका दररोज एक तास आधी सुरू होणार आहेत. मात्र बँका बंद होण्याचा टाईम (Bank time) तोच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 18 एप्रिल 2022 पासून बँका एक तास आधी सुरू करण्यात याव्यात असा आदेश भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देण्यात आला होता. त्यानुसार आता बँका आजपासून सकाळी दहा ऐवजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. आरबीआयच्या या नव्या नियमांचा सर्वसामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे. अनेकां बँकात गर्दी असते, लोकांना आपली कामे करून घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. तसेच अनेक लोकांचा ऑफीस टाईम हा सकाळी दहा वाजेचा असतो. मात्र आता बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू रहाणार असल्यामुळे लोकांना ऑफीसला जाण्यापूर्वी आपली कामे करणे शक्य होणार आहे.
नोकरदार वर्गाला फायदा
आरबीआयने बँकांना दिलेल्या या आदेशाचा सर्वात मोठा फायदा हा नोकऱ्या करणाऱ्यांना होणार आहे. सर्वसाधारणपणे ऑफीसचा टाईम हा सकाळी दहा ते सायंकाळी सहा असा असतो. तसेच रविवारी सुटी असते. त्यामुळे बँकेत एखादे काम असेल तर त्यासाठी खास सुटी काढावी लागायची. मात्र आता असे करायची गरज राहणार नाही. कारण आता बँका या सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे ऑफीसला जाण्यापू्र्वी आपले बँकेतील कामे करणे शक्य होणार आहेत. कोरोनापूर्व काळातच बँकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता. कोरोनापूर्व काळापासूनच बँक या सकाळी 9 वाजता सुरू व्हाव्यात असे आदेश आरबीआयचे होते. मात्र कोरोनामुळे पुन्हा एकदा वेळेत बदल करून बँकांना दहा वाजता सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आलेल्या पुन्हा एकदा बँका या सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहेत.
कॅश विड्रॉलचा नवा नियम
या सोबतच आरबीआयकडून आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना आता लवकरच देशातील सर्वच बँकांच्या एटीएमवर कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तुम्ही डेबिट कार्डचा उपयोग न करता देखील आता एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. ही सर्व यंत्रणा युपीआय सिस्टिमवर काम करणार आहे.