लग्नानंतर पत्नीचा आधार कार्डवरील पत्ता बदलायचाय? मग अशी आहे सोपी पद्धत

Wife Address Change In Aadhar Card : लग्नानंतर पत्नीचे अडनाव आणि तिच्या पत्त्यातील बदलाची प्रक्रिया सुरू होती. आधार कार्डवरील तिचा पत्ता बदलण्यासाठी आणि अडनाव बदलण्यासाठी अशी सोपी प्रक्रिया आहे. त्याआधारे तुम्ही सहज हा बदल करु शकता.

लग्नानंतर पत्नीचा आधार कार्डवरील पत्ता बदलायचाय? मग अशी आहे सोपी पद्धत
असा बदला आधार कार्डवरील पत्नीचा पत्ता
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 12:08 PM

भारतात आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा मानण्यात येतो. अनेक ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून सादर करण्यात येते. आता तर आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यात आले आहे. वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड प्रमाणेच आधार कार्ड पण पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. देशातील जवळपास 90 टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. लग्नानंतर अनेक महिलांना त्यांचे अडनाव आणि पत्ता बदलून घ्यावा लागतो. आधारकार्डवर तशी नोंद करण्यासाठी विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

अनेक सरकारी योजनांसाठी, शिक्षणासाठी वा इतर कामासाठी आधार कार्डची मागणी करण्यात येते. लग्न झाल्यानंतर महिलांना आधार कार्डमध्ये अडनाव आणि पत्ता बदलणे गरजेचे ठरते. लग्नानंतर महिला तिच्या पतीच्या घरी येतात. आधार कार्डमधील बदलाची ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पत्ता आणि अडनावात बदल करु शकता.

आधार केंद्रावर जाऊन करा बदल

हे सुद्धा वाचा

पत्नीच्या आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी जवळच्याच आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. हा बदल करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल. या अर्जात तुम्हाला मागितलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रं जोडावे लागेल. त्याआधारे पत्ता अपडेट करण्यात येईल. पतीच्या आधार कार्ड आधारे पत्ता बदलता येईल.

अडनावात करा बदल

लग्नानंतर अनेक महिला पतीचे अडनाव वापरतात. आधार कार्ड केंद्रावर पत्नीला पतीच्या अडनावाचा हा बदल करता येतो. आधार केंद्रावर केवळ पत्ताच बदलता येत नाही. तर अडनाव सुद्धा बदलता येते. आधार कार्डमधील अर्जावर तुम्हाला अडनाव बदलण्याची माहिती नोंदवावी लागेल.

माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला लग्नपत्रिका पुरावा म्हणून जोडावी लागेल. विवाह प्रमाणपत्र, पतीच्या आधार कार्डची प्रत जोडावी लागेल. अडनाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरकारने बंधनकारक केले आहे. तुम्ही लग्न पत्रिका पण जोडू शकता. त्यानंतर बायोमॅट्रीक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या बदलानंतर काही दिवसांनी अपडेट आधार कार्ड तुमच्या नवीन पत्त्यावर म्हणजे पतीच्या घरी येईल. हे आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन सुद्धा डाऊनलोड करू शकता.

तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.