Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 ऑक्टोबरपासून खर्च वाढणार, CNG आणि PNG महागणार

CNG Rate | देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील.

1 ऑक्टोबरपासून खर्च वाढणार, CNG आणि PNG महागणार
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 11:43 AM

मुंबई: सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबईत CNG आणि पाईप गॅसची (PNG) किंमत 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. ICICI Securities च्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसच्या किंमतीत जवळपास 76 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे सामान्यांचे किचन बजेट कोलम़डण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील.

गॅसच्या किंमती किती वाढणार?

अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे. 1 ऑक्टोबरपासून APM चा दर 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmBtu) इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

CNG आणि PNG महागणार

या दरवाढीमुळे एप्रिल 2022 पर्यंत CNG आणि PNG आणखी महागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गॅसचे दर वाढल्यास ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मोठा फायदा होईल.

पेट्रोल अजूनही शंभरीच्या पलीकडेच

गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.

संबंधित बातम्या:

जनआशीर्वाद कशासाठी? इंधन, गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की महागाई वाढवली म्हणून, जयंत पाटलांचा सवाल

नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पुन्हा वाढली LPG गॅस सिलेंडरची किंमत

त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.