Inflation : सर्वसामान्यांचे पुन्हा हाल, महागाईच नाही तर ईएमआय पण रडवणार
Inflation : सर्वसामान्यांचे पुन्हा हाल होऊ शकतात. सध्या भाजीपाला महाग झाला आहे. डाळी महाग झाल्या आहेत. तर येत्या काही दिवसांत ईएमआय पण खिशा कापण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : महागाईवर (Inflation) नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात मध्यंतरी यश पण आले. पण आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. दैनंदिन वापरातील भाजीपाला महाग झाला आहे. टोमॅटो तर 160 रुपये किलोवर पोहचला आहे. कांदा, अद्रक, लिंबू, हिरवी मिरची आणि इतर भाज्या महागल्या आहेत. भाजीपाला 100 ते 400 रुपयांच्या दरम्यान आहे. डाळीच्या किंमती वाढल्या आहेत. तांदळाचे भाव वाढले आहे. महागाई वाढली तर मग सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होईल. त्यांचा खिसा कापल्या जाईल. सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात. ईएमआय (EMI) वाढण्याची शक्यता आहे.
RBI ने काय दिले संकेत आरबीआयने भाजीपाला महाग झाल्यास काय होऊ शकते, याचे संकेत दिले आहेत. आरबीआयनुसार, रेपो दरात सध्या कपात होणार नाही. यापूर्वी दोनदा रेपो दर जैसे थे ठेवण्यात आले होते. पण वाढती महागाई पाहता रेपो दरात बदल होण्याची शक्यता आहे. रेपो दर कमी तर होणार नाहीत, पण वाढू शकतात.
किती वाढेल रेपो दर महागाई आटोक्यात आली नाही तर आरबीआयला रेपो दरात वाढ करावी लागेल. त्यामुळे सध्या महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारला काम करावे लागणार आहे. पतधोरण समितीची बैठक ऑगस्ट महिन्यात होत आहे. या बैठकीत व्याज दरात 0.25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
6.50 टक्क्यांवर रेपो दर एप्रिल आणि जून महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कुठला ही बदल करण्यात आला नाही. व्याजदर 6.50 टक्क्यांवर स्थिर राहिले. फेब्रुवारीत आरबीआयने व्याज दरात 25 बेसिस पाँईटची वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत व्याज दरात 2.50 टक्के वाढ दिसून आली. जर आता 25 बेसिस पॉईंटची वाढ झाली तर व्याजदर 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहचेल.
महागाईचा फटका ही समीकरणे जुळून आली तर सर्वसामान्यांवर महागाईचा डोंगर कसळेल. त्यांना बाजारात भाजीपाला, डाळी, दैनंदिन वापरातील वस्तू महाग मिळतील. तर दुसरीकडे रेपो रेटमध्ये कपात न होता तो वाढल्याने त्याचा फटका बसेल. गेल्या काही दिवसांपासून हॉटेलिंग पुन्हा महाग झाले आहे. त्यातच ग्राहकांच्या खिशावर वाढलेल्या ईएमआयचा सुद्धा भार पडेल. त्यामुळे त्याचे डबल नुकसान होईल.
व्याजदरात कपात नाही केअरएजचे मुख्य अर्थशास्त्री रजनी सिन्हा यांचे मत थोडे वेगळे आहे. त्यांच्या मते, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपालाच्या भावात चढउतार होतोच. दरवर्षी हा अनुभव येतो. त्यामुळे लागलीच आरबीआय रेपो दरात वाढ करण्याची शक्यता नाही. पण आरबीआय सध्याच्या रेपो दरात कुठलाच बदल करणार नाही, त्यात कपात करणार नाही, हे पण तितकेच खरे असल्याचे मत त्यांनी मांडले. एकवेळ सध्या कपात झाली नाही तरी चालते, पण रेपो दरात वाढ होऊ नये, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.