ITR : इनकम टॅक्स रिटर्न भरताना उडतो गोंधळ? प्राप्तिकर खात्याने आणला हा जोरदार फॉर्म्युला..

ITR : आता इनकम टॅक्स रिटर्न भरणे सोपे होणार आहे. काय होणार आहेत, बदल जाणून घेऊयात..

ITR : इनकम टॅक्स रिटर्न भरताना उडतो गोंधळ? प्राप्तिकर खात्याने आणला हा जोरदार फॉर्म्युला..
आता अर्ज होईल सुटसुटीतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 3:33 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरताना सर्वसाधारण करदात्यांना (Tax Payer) येणारी अडचण लवकरच दूर करण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) एक कॉमन ITR फॉर्म आणण्याच्या तयारीत आहे. नवीन अर्ज लागू झाल्यानंतर टॅक्स रिटर्न भरतानाचा उडणारा गोंधळ कमी होईल.

त्यासाठी CBDT ने करदात्यांकडून उपाय आणि सूचना मागितल्या आहेत. तुम्हालाही प्राप्तिकर भरताना काही अडचण अथवा समस्या आल्यास तुम्ही बिनदिक्कतपणे या अडचणी आणि त्यावरील उपाय सांगू शकता.

तुम्ही सांगितलेले उपाय आणि सूचना याआधारे CBDT एक सर्वमान्य मसूदा (Draft) तयार करणार आहे. सध्या मंडळाने ITR चा एक कॉमन अर्ज तयार केलेला आहे. तोही तुम्ही बघू शकता. त्यात काही बदल सुचवायचा असेल तर तो सुचविता येईल.

हे सुद्धा वाचा

सध्या आयकर रिर्टन भरण्यासाठी 7 वेगवेगळ अर्ज आहेत. CBDTच्या नवीन प्रस्तावानुसार, ही नवीन व्यवस्था लागू झाल्यास हे सात वेगवेगळे फॉर्म हद्दपार होतील आणि गोंधळाची जागा हा नवीन फॉर्म घेईल.

CBDT ने नवीन व्यवस्था लागू केल्यावर ITR-1 ते ITR-6 पर्यंतचे सर्व अर्ज बाद होतील आणि त्याऐवजी एक कॉमन अर्ज आयटीआर भरण्यासाठी वापरता येईल. तर केवळ ITR-7 हा अर्ज उरेल. तो भरुन द्यावा लागेल. हा अर्ज फर्म आणि नॉन प्रॉफिट संघटनांसाठी आहे.

पण 50 लाखपर्यंतची कमाई करणाऱ्या करदात्यांसाठी ITR-1 आणि ITR-4 हा अर्ज प्रस्तावित कॉमन अर्ज आल्यानंतरही भरून द्यावा लागणार आहे. हे दोन्ही अर्ज त्यामानाने सोपे मानले जातात. कॉमन अर्जासोबत त्यांना हे अर्ज भरून देता येतील.

या अर्जामुळे करदात्यांची वेळेची बचत होईल. कारण या अर्जावर करदात्यांची अर्धेअधिक माहिती अगोदरच भरलेली असेल. उत्पन्नाची काही माहिती, तपशील करदात्यांना तेवढा भरावा लागेल.

तुम्हालाही काही सूचना द्यायच्या असतील तर incometax.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ITR फॉर्म फीडबॅक पर्यायमध्ये तुमचे मत नोंदविता येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.