केंद्राच्या सोयीस्कर भूमिकेने नागरिकांचे ‘तेल’ काढले! भरमसाठ किंमती वाढविल्यानंतर खाद्यतेलाचे भाव 5 ते 20 रुपयांनी घसरल्याची फुशारकी
सर्वसामान्यांचे महागाईने अगोदरच कंबरडे मोडले आहे तर खाद्यतेलांनी तेल काढले आहे. तरीही केंद्र सरकार तेलाच्या किंमतीत प्रत्येक किलोमागे 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्याचा दावा करत आहे. परंतू गेल्या वर्षी तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या याविषयी सोयीस्कर भूमिका घेत आहे. केंद्राच्या दाव्यानुसार, गोडतेल अर्थात शेंगदाणा तेल 180 रुपये किलो, मोहरीचे तेल 184.59 प्रति किलो, तर सोयाबीन प्रति किलो 148.85, सूर्यफूल 162.4 प्रति किलो आणि पामतेल 128.5 रुपये प्रति किलो असा दर आहे.
केंद्र सरकारच्या सोयीस्कर भूमिकेचे भारतीयांनी अनेकदा ‘याची देही याची डोळा दर्शन’ घेतले आहे. आता पुन्हा केंद्र सरकारने नागरिकांना चमत्काराचे तेल दाखविले आहे. सर्वसामान्यांचे महागाईने अगोदरच कंबरडे मोडले आहे तर खाद्यतेलांनी तेल काढले आहे. तरीही केंद्र सरकार तेलाच्या किंमतीत प्रत्येक किलोमागे 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्याचा दावा करत आहे. परंतू गेल्या वर्षी तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या याविषयी केंद्र सरकारने सोयीस्कर भूमिका घेतली आहे.
दोन वर्षांपूर्वी शंभरची आतबाहेर असणा-या घरगुती तेलाच्या किंमतींनी आता दोनशे रुपयांचा टप्पा गाठण्याचा आवकाश आहे. त्यावर केंद्राने मौन धारण केले आहे. मात्र तेलाच्या किंमती प्रत्येक किलोमागे घसरल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. पाम तेल 2019 मधील नोव्हेंबर महिन्याच्या 18 तारखेला 85 ते 87 रुपये प्रति लिटर मिळत होते. एका वर्षानंतर 2020 मध्ये त्याच दिवशी तेलाच्या किंमती एकदम भडकल्या. पामतेलाने शंभरी पार केली. तर जानेवारी 2021 मध्ये पाम तेल 115 रुपये प्रति लिटर झाले. लिटरमागे आणि किलोमागे तेल दरात प्रचंड वाढ झालेली आहे. गोडतेल अर्थात शेंगदाणा तेल 180 रुपये किलो, मोहरीचे तेल 184.59 प्रति किलो, तर सोयाबीन प्रति किलो 148.85, सूर्यफूल 162.4 प्रति किलो आणि पामतेल 128.5 रुपये प्रति किलो असा सध्या दर आहे. Live Hindusta ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.
काय आहे केंद्राचा दावा
केंद्र सरकारनुसार, देशभरात खाद्यतेलाच्या किंमती उतरल्या आहेत. प्रति किलोमागे 5 ते 20 रुपयांनी भावात घसरण झाली आहे. ऑक्टोबर 2021 पासून केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे ही घसरण झाली आहे. भावात सातत्याने घसरण होत आहे. देशभरातील 167 ठिकाणाहून यासंबंधी केंद्राने माहिती जमा केली होती. त्यानुसार, खाद्यतेलाचे दर आटोक्यात आले असून त्यांच्यात वाढ नोंद झाली नसल्याचे ग्राहक संरक्षण खात्याचे म्हणणे आहे.
किती फरक पडला
ग्राहक संरक्षण खात्यानुसार, 1 ऑक्टोबर 2021 रोजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेल दरात प्रत्येक किलोमागे 1.50 ते 3 रुपये दर कपात झाली होती. आता सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या किंमतीत प्रत्येक किलोमागे 7 ते 8 किलोंची घसरण झाली आहे. तर पॅकबंद तेलाच्या किंमतीत प्रती लिटर मागे 15 ते 20 रुपयांची घसरण झाली आहे. यामध्ये अदानी आणि रुची इंडस्ट्रीजचा पुढाकार आहे. जेमिनी, मोदी नॅचरल्स, विजय सोलविक्स, गोकूल या सारख्या ब्रँडच्या तेलाच्या किंमत ही घसरल्या आहेत.
धोरणामुळे किंमती कमी
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना, केंद्र सरकारच्या धोरणामुळे, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यात यश आले आहे .ऑक्टोबर 2021 पासून तेलाच्या किंमतीत कुठलीही मोठी दरवाढ झाली नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. आयात शुल्क घटविल्यानंतर तसेच तेलसाठा न करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून या तेलाच्या किंमती आटोक्यात आल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारातील घाऊक तेल किंमती स्थिर ठेवण्यासंबंधी केंद्र सरकार तेल उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
प्रवासात सामानाची चिंता सोडा, भारतीय रेल्वेचे ‘मिशन सामानवापसी’; 2 कोटींचे साहित्य परत
पीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल, लॉकरच्या दरात वाढ