मोठं यश! आता हे सॉफ्टवेअर सांगणार कोणत्या रुग्णाला व्हेंटीलेटर आणि आयसीयूची गरज
आता सॉफ्टवेअरच्या मदतीने कोरोना रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटीलेटर सपोर्टची गरज आहे की नाही हे ओळखता येणार आहे.
मुंबई : आता सॉफ्टवेअरच्या मदतीने कोरोना रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटीलेटर सपोर्टची गरज आहे की नाही हे ओळखता येणार आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेवर तातडीने आवश्यक व्यवस्था पुरवणं शक्य होणार आहे. कोविड सेविरिटी स्कोर (सीएसएस) असं या सॉफ्टवेअरचं नाव आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एक अल्गोरिदम आहे. हा अल्गोरिदम कारोना रुग्णांच्या अनेक निकषांच्या आधारे रुग्णांची ओळख करतो. हे सॉफ्टवेअर प्रत्येक रुग्णासाठी एक पूर्वनिश्चित डायनेमिक एल्गोरिदमच्या मदतीने अनेक वेळा स्कोअर काढतो. तसेच एक ग्राफिकल ट्रेंडमध्ये याचा निकाल मॅप करण्यासाठी एक कोविड सेविरिटी स्कोअर (सीएसएस) सांगतो (Covid Severity Score software to help hospital for identify patients need of ventilator support and ICU).
कोविड सेंटरवरही सॉफ्टवेअर
या सॉफ्टवेअरचा उपयोग कोलकाता आणि उपनगरांमधील 3 सार्वजनिक कोविड केअर सेंटर्समध्ये करण्यात आलाय. यात कोलकाताच्या बरकपुरातील एक 100-बेडच्या सरकारी कोविड सेंटरचा समावेश आहे. कोरोना काळात अचानक आयसीयू आणि इतर आपातकालीन सेवा पुरवणं रुग्णालयांसाठी एक मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितित वेळेवर रुग्णांची स्थिती आणि आवश्यक सुविधांची माहिती मिळणे आरोग्याच्या या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करणार आहे.
सॉफ्टवेअरचा शोध कुणी लावला?
फाऊंडेशन फॉर इनोवेशन इन हेल्थ, कोलकाता, विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग, भारत सरकारच्या सायन्स फॉर इक्विटी, एम्पॉवरमेंट अँड डेवलपमेंटच्या (सीड) मदतीने आणि आयआयटी गुवाहाटीच्या सहभागाने डॉ. केविन धालीवाल, एडिनबर्ग विश्वविद्यालय आणि डॉ. सायंतन बंदोपाध्याय, डब्ल्यूएचओ (दक्षिण एशिया विभागीय कार्यालय) यांच्या प्रयत्नाने हा अल्गोरिदम विकसित झालाय. यामुळे रुग्णांची लक्षणं, इतर संकेत, महत्वपूर्ण निकष, परीक्षण रिपोर्ट आणि कोविड बाधित रुग्णांचा संसर्ग मोजला जातो. या प्रत्यक गोष्टीला सॉफ्टवेअरमधील माहितीच्या आधारे एक स्कोअर दिला जातो. अशाप्रकारे एक कोविड सेविरिटी स्कोर ( सीएसएस) देण्यात येतो.
हेही वाचा :
देशात 1 लाख फ्रंटलाइन वर्कर तयार होणार, सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार, वाचा सविस्तर
आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?
तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या
व्हिडीओ पाहा :
Covid Severity Score software to help hospital for identify patients need of ventilator support and ICU