EPFO : पासबुक पोर्टल पुन्हा पडलं ठप्प, अजूनही आले नाही ताळ्यावर, असे चेक करा पीएफ बॅलन्स

EPFO : ईपीएफओचं पासबुक पोर्टल ठप्प पडल्याने खातेदारांना आता खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेणे कठिण झाले आहे. पण त्यावर हा खास उपाय आहे, सोप्या पद्धतीने तुम्हाला खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेता येईल.

EPFO : पासबुक पोर्टल पुन्हा पडलं ठप्प, अजूनही आले नाही ताळ्यावर, असे चेक करा पीएफ बॅलन्स
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 8:16 PM

वी दिल्ली : देशातील 6.5 कोटी पीएफ खातेदारांसाठी (PF Account Holder) महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसमोर एक अडचण आली आहे. त्यांच्या खात्यातील रक्कम किती आहे, याचा तपशील मिळण्यात अडचण येत आहे. कारण ईपीएफओचे पासबुक पोर्टल ठप्प पडले आहे. हे पासबूक पोर्टल (Passbook Portal) वारंवार क्रॅश होत आहे. ईपीएफओने यामध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. या पोर्टलवर गेल्यावर कर्मचाऱ्यांना 404 हा एरर समोर येत आहे. पण तरीही खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम या सोप्या पद्धतीने तपासता येणार आहे.

सातत्याने अडचण मीडियातील अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांपासून ईपीएफओची साईट सातत्याने डाऊन सुरु आहे. त्यामुळे सदस्यांना सर्वच अपडेट साठी खूप वाट पहावी लागत होती. आता तर 20 एप्रिलपासून साईटला जास्त अडचणी येत आहेत. ही साईट वारंवार क्रॅश होत आहे. त्यामुळे ई-पासबुक सेवेचा लाभ सदस्यांना घेता येत नाही.

एसएमएस सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

हे सुद्धा वाचा
  1. EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल.
  2. तुम्हाला फक्त 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवायचा आहे. इथे तुमच्या प्राधान्याच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे दर्शविली जातात. ( उदा. ‘ENG’) तुम्हाला एसएमएस तमिळमध्ये मिळवायचा असल्यास ‘TAM’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ वगैरे लिहू शकता. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
  3. या संदर्भात, तुम्ही तुमचे UAN तुमचे बँक खाते, आधार आणि PAN शी सिंक करायला विसरू नका. कारण EPFO त्याच्या सदस्यांचे तपशील संग्रहित करते. तुम्ही तुमच्या नियोक्त्याला तुमच्यासाठी सीडिंग करण्यास देखील सांगू शकता.

मिस्ड कॉल सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

  1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता.
  2. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून कॉल करावा लागेल.
  3. तुम्ही UAN पोर्टलवर नोंदणी केली असल्यास तुम्हाला तपशील प्रदान केला जाईल. या संदर्भात तुम्हाला तुमचा UAN लक्षात ठेवण्याची गरज नाही.

उमंग ॲपद्वारे पैसे तपासा

  1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा
  2. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून उमंग ॲपमध्ये लॉग इन करा
  3. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा
  4. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा
  5. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.