Aadhaar Card : असे तयार करा डुप्लिकेट आधार कार्ड! इतकी सोपी प्रक्रिया

Aadhaar Card : मोबाईल क्रमांक नसला तरी तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्ड तयार करता येईल. पीव्हीसी कार्ड आता लोकप्रिय झालेले आहे. हे कार्ड तुम्हाला ही तयार करता येईल. त्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

Aadhaar Card : असे तयार करा डुप्लिकेट आधार कार्ड! इतकी सोपी प्रक्रिया
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 6:55 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : आधार कार्ड क्रमांक (Aadhaar Number) या काळात सर्वात महत्वपूर्ण दस्तावेज आहे. आज बँकेत खाते उघडायचे असेल, सिम कार्ड (Sim Card) खरेदी करायचे असेल. घर अथवा एखादे वाहन खरेदी करायचे असेल. शेअर बाजारात डिमॅट खाते उघडायचे असेल तर आधार कार्डची गरज पडतेच. अशा अनेक ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची गरज पडते. आधार कार्ड हीच आता तुमची खरी ओळख आहे. परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट तयार करण्यासाठी हेच ओळखपत्र महत्वाचे आहे. त्यामुळे आधार कार्ड खिशात असणे आवश्यक आहे. आधार कार्ड हरवू शकते. त्यासाठी डुप्लिकेट आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक जोडलेला नसला तरी तुम्हाला आधार कार्ड तयार करते. ही प्रक्रिया सोपी आहे.

पीव्हीसी कार्डसाठी करा अर्ज

आधार कार्ड हरवले तर UIDAI तुम्हाला नवीन आधार कार्ड तयार करण्याची सुविधा देते. त्यासाठी मोबाईल क्रमांक लागतो. त्यावर ओटीपी येतो. पण मोबाईल क्रमांक नोंदणी नसेल तरीही तुम्हाला आधारा कार्ड तयार करता येते. त्यासाठी तुम्ही पीव्हीसी कार्डसाठी अर्ज करु शकता. नागरिकांना त्यांच्या आधार पीव्हीसीच्या पडताळणीसाठी इतर कोणत्याही मोबाईल क्रमांकावर ओटीपी मागविता येतो.

हे सुद्धा वाचा

काय आहे आधारची नवीन प्रक्रिया

भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार पीव्हीसी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत साधी आणि सोपी आहे. कोणताही भारतीय नागरिक घरबसल्या हे आधार कार्ड घरी मागवू शकते. त्यासाठी आधार रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाची पण गरज नाही. स्पीड पोस्टाच्या सहायाने तुमच्या घरी पीव्हीसी आधार कार्ड मिळेल. आधार पीव्हीसी ऑर्डर करण्यासाठी तुम्ही मित्र, नातेवाईकांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मागवू शकता. त्यासाठी युआयडीएआयने एक लिंक पण शेअर केली आहे.

दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर मिळेल सुविधा

पीव्हीसी आधारकार्ड (PVC Aadhaar Card) तयार करण्यासाठी कोणाचा पण रजिस्टर क्रमांक वापरु शकता. त्यावर ओटीपी मागविता येतो. पण रजिस्टर क्रमांकावर ज्या सुविधा मिळतात. त्या यावर मिळणार नाही. इतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी मागितल्यावर तुम्हाला आधाराच प्रिव्ह्यू बघायला मिळणार नाही. इतर तपशील ही मिळणार नाही.

काय आहे प्रक्रिया

  1. सर्वात अगोदर https:// uidai.gov.in या संकेतस्थळावर जा
  2. स्क्रॉल डाऊन करा. सर्वात खाली ऑर्डर आधार PVC कार्ड वर क्लिक करा
  3. My Aadhaar Section मध्ये Order Aadhaar PVC Card साठी क्लिक करा
  4. तुमच्या स्क्रीनवर आता एक नवीन पेज उघडेल
  5. याठिकाणी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक 16 अंकी व्हर्च्युअल आयडी टाका
  6. आधार क्रमांक टाकल्यावर कॅप्चा भरा
  7. आता Send OTP वर क्लिक करा
  8. कोणत्याही नोंदणीकृत मोबाईलवर 6 अंकी OTP येईल
  9. हा OTP क्रमांक टाका, नियम आणि अटींवर क्लिक करा आणि सबमिट करा
  10. स्क्रीनवर नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुमचे आधारचे तपशील असतील
  11. खालच्या बाजूस पेमेंट गेटवे असेल. मेक पेमेंट वर क्लिक करा
  12. याठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंग आणि UPI द्वारे पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल.
  13. योग्य पर्याय निवडून पेमेंट करा, पावती डाऊनलोड करा
  14. PVC आधार कार्ड भारतीय पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे घरपोच मिळेल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.