Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा फटका ठरलेला
क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर अनेकजण खरेदी करताना करतात. क्रेडिट कार्ड वापरल्यावर रिवॉर्डस आणि फायदे देखील मिळतात. मात्र, क्रेडिट कार्डचा वापर जपून करणं आवश्यक आहे.
नवी दिल्ली: क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर अनेकजण खरेदी करताना करतात. क्रेडिट कार्ड वापरल्यावर रिवॉर्डस आणि फायदे देखील मिळतात. मात्र, क्रेडिट कार्डचा वापर जपून करणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य प्रकारे केल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला राहिल्यास कर्ज (Loan) मिळण्यामध्ये फायदा होतो. मात्र, क्रेडिट कार्ड चा वापर योग्य प्रकारे न केल्यास तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे.क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टी टाळणं देखील आवश्यक आहे.
वेळेत रक्कम जमा न करण
ज्यावेळी कार्डधारक क्रेडिट कार्ड वापरतात त्यावेळी क्रेडिट कार्डवरुन खरेदी केलेल्या रकमेची परतफेड करत असतात. काही जण वेळेत क्रेडिट कार्ड वापरतात मात्र परतफेड करताना पूर्ण रक्कम भरत नाहीत. त्यानंतर 5 टक्के ते 40 टक्केपर्यंत दंड कंपन्यांकडून आकारला जातो. त्यामुळं ही गोष्ट टाळणं आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डवरुन रक्कम काढणं टाळावं
क्रेडिट कार्डवरुन पैसे काढळ्यास एक नाही तर दोन प्रकारचे चार्जेस लागतात. रक्कम काढताना 3.5 टक्के कॅश अॅडव्हान्स चार्जेस लावले जातात. तर 23 टक्के ते 49 टक्के फायनान्स चार्जेस लावले जातात. हे चार्जेस रक्कम काढल्यापासून ते परत जमा करेपर्यंत लागू असतात.
संपूर्ण क्रेडिट लिमिटचा वापर करणे
जर तुम्ही निमयितपणे संपूर्ण क्रेडिट लिमिटचा वापर करत असाल तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होते. क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 40 टक्के लिमिट वापरण आवश्यक आहे.
इंट्रस्ट फ्री पिरियडचा योग्य वापर
क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन आणि परतफेड दरम्यानच्या कालावधीला इंस्ट्रस्ट फ्री पिरियड म्हटलं जातं. हा कालावधी सामान्यपणे 18 ते 55 दिवसांचा असतो. यामध्ये केलेल्या व्यवहारावर कोणाताही चार्ज लागत नाही.
इतर बातम्या:
Credit card users must follow the some things to avoid credit card charges