Good News | इंधन होणार स्वस्त? सणासुदीत सरकारकडून जनतेला गिफ्ट!
Good News | भारतीयांचा सणाचा आनंद द्विगुणित होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारतीयांचा सणाचा आनंद (Festive Mood) द्विगुणित होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या (Crude Oil) आघाडीवर सर्वसामान्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) कमी होण्याची दाट शक्यता आहे. पण त्यामागची कारणे काय आहेत..असा दावा का करण्यात येत आहे?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सध्या वेगाने कमी होत आहे. झर झर घटणाऱ्या किंमतींमुळे सरकार कंपन्यांवरील नुकसानीचा बोजा घटणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत दर कपातीची आनंद वार्ता मिळू शकते.
सध्या ब्रेंट क्रूडच्या किंमती जानेवारीच्या मध्यात होत्या, तेवढ्या झाल्या आहेत. किंमती सध्या सर्वात कमी आहे. अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा हा परिणाम आहे. दर वाढीमुळे वृद्धीचा वेग मंदावेल आणि पेट्रोल-डिझेलची मागणी घटेल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमती 86.15 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचल्या. एकाच दिवशी यामध्ये कमाल म्हणजे 5 टक्क्यांची कपात झाली. त्याचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमती 30 ऑगस्टपासून 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत.
तर 6 सप्टेंबरपासून कच्च्या तेलाचे भाव 95 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले आहेत. दुसरीकडे डब्लूटीआई क्रूड आज 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले आहेत. यामध्ये शुक्रवारी जवळपास 6 टक्क्यांची घसरण झाली. भारतीय तेल कंपन्यांच्या किंमतीवर ब्रेंट क्रूडचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो.
जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याजदर वृद्धीचा सपाटा लावला आहे. एकट्या अमेरिका अथवा ब्रिटनमधील केंद्रीय बँकेने व्याजदर वृद्धी केलेली नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे किंमती घसरत आहेत. या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.