ऑनलाईन व्यवहार करताना पैशांची फसवणूक झाली तर लगेच ‘या’ नंबरवर कॉल करा

Cyber Crime | केंद्र सरकारने 1 एप्रिल रोजीच मर्यादित स्वरुपात ही हेल्पलाईन लाँच केली होती. ही हेल्पलाईन आणि तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँक, पेमेंट बँक, वॉलेटस आणि ऑनलाईन मर्चंटसकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाते.

ऑनलाईन व्यवहार करताना पैशांची फसवणूक झाली तर लगेच 'या' नंबरवर कॉल करा
Cyber Crime
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 10:42 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याच्यादृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची तात्काळ तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने आता एक विशेष हेल्पलाईन उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तुमची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्यास तातडीने 155260 या क्रमांकावर फोन करुन तुमची तक्रार नोंदवता येईल. जेणेकरून तुमचे खाते ब्लॉक होऊन त्यामधून रक्कम काढता येणार नाही. (Cyber Crime helpline for online financial fraud)

केंद्र सरकारने 1 एप्रिल रोजीच मर्यादित स्वरुपात ही हेल्पलाईन लाँच केली होती. ही हेल्पलाईन आणि तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँक, पेमेंट बँक, वॉलेटस आणि ऑनलाईन मर्चंटसकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाते. गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरकडून या सर्व गोष्टी हाताळल्या जातात.

सध्याच्या घडीला देशातील 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही हेल्पलाईन कार्यरत आहे. यामध्ये छत्तीसगढ, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत या हेल्पलाईनमुळे 1.85 कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार रोखण्यात यश मिळाले आहे. लवकरच संपूर्ण देशात ही हेल्पलाईन सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

हेल्पलाईन नक्की कशाप्रकारे काम करते?

ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांनी 155260 या क्रमांकावर फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून सर्व माहिती घेऊन सायबर फसवणूक नोंदणी आणि व्यवस्थापन प्रणालीवर एक सूचना जारी केली जाते. त्यामुळे ही माहिती संबंधित बँक, वॉलेटस आणि मर्चंटसपर्यंत पोहोचते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला तक्रार क्रमांक पाठवला जातो. यानंतर 24 तासांच्या आत या व्यक्तीने https://cybercrime.gov.in/ या पोर्टलवर आपल्या फसवणुकीचा सर्व तपशील नमूद करणे गरजेचे असते.

फसवणूक केल्यानंतर ज्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले असतील ते बँकेतच असल्यास तातडीने त्या खात्याव बंदी आणली जाते. जेणेकरून फसवणूक करणाऱ्या माणसाला ते पैसे काढता येणार नाहीत. देशातील सर्व प्रमुख बँका या पोर्टलशी जोडल्या असल्याने तक्रारदाराला तातडीने मदत मिळते.

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा

IRCTC वरुन ट्रेन, फ्लाईट बूक केली, आता बाईकही बूक करण्याची संधी, ‘ही’ ट्रिप तुमचा आनंद द्विगुणीत करेल

Add New Member in Ration Card : घरात नव्या सदस्याची एंट्री, रेशन कार्डात नाव कसे जोडाल?

(Cyber Crime helpline for online financial fraud)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.