आता UPI वापरण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही; बँकांनाही देण्यात आल्या होत्या सूचना; काय आहेत UPI चे तपशील वाचा
NPCI ला ही नवीन सेवा सुरू करण्यासाठी आता एक मोठी इकोसिस्टम तयार करावी लागणार आहे, त्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे या योजनेला उशीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईः 8 सप्टेंबरच्या परिपत्रकात म्हटले आहे की UPI ग्राहकांनी आधार OTP ने व्यवहार केल्यास त्यांना सुरक्षित आणि सुलभ पर्याय मिळेल. ही प्रणाली ग्राहकांसाठी सुलभ करण्यासाठी NPCI आणि UIDAI एकत्र काम करत आहेत. सध्या ज्या यूजर्सकडे डेबिट कार्ड (Debit Card) नाही, ते आता UPI वापरू शकणार आहेत, मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. आधारकार्डवर (Adhar Card) आधारित असलेल्या UPI सुरू करण्याची अंतिम मुदत 15 मार्च ठेवण्यात आली होती, आणि याबाबत बँकांनाही (Bank) त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता या गोष्टीला वेळ लागणार आहे. NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांच्याकडून सप्टेंबर 2021 मध्येच याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याची अजून तरी अंमलबजावणी करण्यात आली नाही. ही सुविधा वापरण्यासाठी आधार कार्डला लिंक असलेला मोबाइल क्रमांक तसेच बँक खात्यासाठीही दिलेला मोबाइल क्रमांक आणि UPI साठी वापरलेला मोबाइल क्रमांक हा सारखाच असावा लागणार आहे.
NPCI कडून संबंधित बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र आता वेगवेगळ्या कारणांमुळे याला वेळ झाला आहे. त्यामुळे यासाठी 15 मार्च 2022 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली.
NPCI आणि UIDAI यांच्याकडून एकत्र काम
याबाबत जे 8 सप्टेंबर रोजी जे परिपत्रक काढले आहे त्याममध्ये असे म्हटले आहे की UPI ग्राहकांकडून आधार कार्डवर OTP ने व्यवहार केल्यास त्यांना सुरक्षित आणि सोपा पर्याय मिळणार आहे. ही सुविधा ग्राहकांना सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी NPCI आणि UIDAI यांच्याकडून एकत्र काम करण्यात येत आहे.
ओळखीसाठी डेबिट कार्डचे तपशील
अनेकदा अॅप्लिकेशन्सचा वापर हा बँकेच्या ग्राहकाची ओळख तपासणीासाठी आणि त्यांच्या डेबिट कार्डचा तपशील पाहण्यासाठी केला जातो. परंतु या नवीन सुविधांमुळे यूजर्स त्यांच्या डेबिट कार्डचा तपशील न देता डिजिटल व्यवहार करू शकणार आहेत. UPI च्या या योजनेचा विशेष लाभ खेड्यापाड्यातील आणि शहरात राहणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास आहे. ज्या लोकांकडे डेबिट कार्ड नाही किंवा त्यांचे डेबिट कार्ड कोणत्याही कारणांमुळे बंद झाले आहे त्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
NPCI ला ही नवीन सेवा सुरू करण्यासाठी आता एक मोठी इकोसिस्टम तयार करावी लागणार आहे, त्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे या योजनेला उशीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
भाजपची कार्यपद्धती देशहिताची नाही, BJP सत्तेत न येणं ही काळाची गरज: Blasaheb Thorat
Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी