Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya : शरयू आज उजळून निघणार, आयोध्येत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचणार..

Ayodhya : शलयू तीरावर आज इतिहास स्वतः ऐतिहासिक सोहळ्याचा पुन्हा एकदा साक्षीदार होणार आहे..

Ayodhya : शरयू आज उजळून निघणार, आयोध्येत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचणार..
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 7:06 PM

आयोध्या : प्रभू श्रीरामाच्या (Shriram) पावन आयोध्या नगरीत आज इतिहास घडणार आहे. आयोध्या नव्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार होणार आहे. आयोध्येत (Ayodhya) आज गिनीत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Genius of World Record) रचल्या जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला देश-विदेशातून अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे ही या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होतील.

दीपावलीच्या पावन प्रकाश पर्वात आयोध्येत दिव्यांची आरस लागणार आहे. आतापर्यंतचे दिवे लागणीचे सर्व रेकॉर्ड तुटणार आहेत. या प्रकाश पर्वात अवघी आयोध्या नगरी उजळून निघणार आहे. शरयू नदीचा घाट लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशमय होणार आहे.

हा सोहळा मेगा इव्हेंटपेक्षा कमी नसेल. शरयूच्या घाटावर तब्बल 18 लाख दिवे लावण्याचा विक्रमी विक्रम करण्यात येणार आहे. गेल्यावर्षींपेक्षा कितीतरी दिवे प्रकाशाचे साक्षीदार होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये आयोध्या दीपोत्सवाची सुरुवात केली. हा सहावा दीपोत्सव आहे. यंदा ही पंतप्रधान या सोहळ्याला हजेरी लावत आहे. त्यांचे या पुण्यभूमीत आगमन झालेले आहे. थोड्याच वेळात डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव अनुभवता येईल.

शरयूच्या घाटावर तब्बल 18 लाख दिवे नवा जागतिक विक्रम करतील. 40 मिलीलीटरचे हे दिवे असतील. त्यासाठी 3500 लीटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे.

या प्रकाशपर्वासाठी 22 हजार स्वयंसेवक प्रशासनाच्या दिमतीला असतील. हा सोहळा टिपण्यासाठी जगभरातील यात्रेकरु, प्रवाशी, पर्यटकांनी शरयू तीरावर अफाट गर्दी केलेली आहे. आपल्यालाही टीव्ही,इंटरनेटच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळा डोळ्यात साठवता येणार आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.