Share : या कंपनीचा शेअर तुमच्याकडे आहे का? मग व्हा मालामाल.. प्रति शेअर 850 रुपये कंपनी देणार..

Share : या कंपनीचा शेअर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मालामाल होणार आहात..

Share : या कंपनीचा शेअर तुमच्याकडे आहे का? मग व्हा मालामाल.. प्रति शेअर 850 रुपये कंपनी देणार..
कंपनीची जोरदार ऑफरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 5:51 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल (Quarter Result) येत आहेत. त्यामध्ये काही कंपन्यांनी (Company) जोरदार नफा कमावला आहे. कंपनीसाठी ज्या गुंतवणूकदारांनी मदत केली, त्यांना मोबदला देण्याचा प्रयत्न काही कंपन्यांनी सुरु केला आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी (Buy Back offer) करणार आहे. प्रत्येक शेअरसाठी ही कंपनी गुंतवणूकदारांना 850 रुपये देणार आहे.

धानुका अग्रीटेक (Dhanuka Agritech) ने मंगळवारी तिमाही निकाल जाहीर केले आहे. तर शेअरच्या बायबॅकची (Buy Back) घोषणाही केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागणार आहे.

ही कंपनी गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी करणार आहे. त्यासाठीची नोंदणीकृत तारखेची घोषणाही (Dhanuka Agritech Buy Back Record Date) कंपनीने केली आहे.

हे सुद्धा वाचा

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनी बोर्डाची बैठक झाली. त्यात 2 रुपयांची फेसव्हॅल्यू असणाऱ्या शेअरची खरेदी करण्यात येणार आहे. कंपनीने त्यासाठीची किंमतही जाहीर केली आहे.

कंपनी 850 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने 10 लाख शेअर गुंतवणूकदारांकडून खरेदी करणार आहे. कंपनीने बायबॅक शेअरसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजीची तारीख जाहीर केली आहे.

कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 15 टक्क्यांचा फायदा झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा दुसऱ्या तिमाहीत 73 कोटी रुपये इतका राहिला आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा याच कालावधीतील नेट प्रॉफिट 63 कोटी रुपये होता.

यंद कंपनीचा शेअर 6.98 टक्क्यांनी घसरला. यावर्षी कंपनीचा शेअरचा भाव 782 रुपयांहून 727 रुपये झाला. तर गेल्या वर्षी कंपनीच्या शेअरने चांगली कामगिरी बजावली होती. शेअरमध्ये 3.07 टक्क्यांची घसरण झाली होती.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.