गेल्या दोन वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीने वाढ; जाणून घ्या ग्राहक का निवडत आहेत युपीआयचा पर्याय?
ग्राहक सध्या पैशांचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कुठल्याही बँकेत न जाता अवघ्या काही सेकंदात घरी बसल्या तुम्ही डिजिटल पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करू शकता. गेल्या वर्षभरात युपीआय Unified Payment Interface च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : ग्राहक सध्या पैशांचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कुठल्याही बँकेत न जाता अवघ्या काही सेकंदात घरी बसल्या तुम्ही डिजिटल पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करू शकता. गेल्या वर्षभरात युपीआय Unified Payment Interface च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली असून, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात युपीआयच्या माध्यमातून तब्बल 456 कोटी ट्राझेक्शन झाले आहेत. या ट्राझेक्शनच्या माध्यमातून सव्वा आठ लाख कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. 2020 च्या तुलनेमध्ये युपीआय ट्राझेक्शनमध्ये गेल्या वर्षी दुपटीने वाढ झाली आहे.
गेल्या दोन वर्षांत व्यवहारांमध्ये दुपटीने वाढ
युपीआय Unified Payment Interface ला 2016 मध्ये लॉंच करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये पहिल्या वेळेस युपीआयच्या माध्यमातून एक अब्ज ट्राझेक्शन झाले होते. त्यानंतर ही संख्या दुपटीने वाढली 2020 मध्ये दोन अब्ज ट्राझेक्शन झाले तर 2021 मध्ये ही संख्या वाढून तब्बल 456 कोटी ट्राझेक्शन वर पोहचली आहे. जेफरीजच्या अंदाजानुसार चालू वर्षात देशातील एकूण आर्थिक व्यवहारांपैकी सुमारे 50 टक्के व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होण्याची शक्यता आहे.
नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना
विशेष: नोटबंदीनंतर डिजिटलायझेशनला चालना मिळाली. लोक युपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करू लागले. सरकार देखील डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलताना दिसून येत आहे. नव्या नियमानुसार तुम्ही आता पाच हजारांपर्यंतचे व्यवहार हे युपीआयच्या माध्यमातून कन्फर्मेशनशिवाय करून शकता. मात्र त्यापेक्षा अधिकचे व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला आता बँकेकडून परवानगी मागण्यात येते. तुम्ही परवानगी दिल्यानंतरच तुमचा पैशांचा व्यवहार पूर्ण होतो. हे डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून उचलण्यात आलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल पे, भीम अशा विविध प्लॅटफॉमच्या मदतीने डिजिटल व्यवहार करू शकता. सध्या युपीआयच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा एक लाख एवढी आहे. युपीआयला मिळणारा प्रतिसाद पहाता ही मर्यादा सरकार भविष्यामध्ये वाढवण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातम्या
LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे
Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!