AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून उपयोग करता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकते फसवणूक

हॉटेलमध्ये चेक इन (Check in) करताना किंवा रेल्वेमधील टीसीनं (tc) तुमच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर तुम्ही पॅनकार्ड (PAN card) दाखवत असताल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर होऊ शकतो.

तुम्हीही पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून उपयोग करता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकते फसवणूक
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:30 AM

हॉटेलमध्ये चेक इन (Check in) करताना किंवा रेल्वेमधील टीसीनं (tc) तुमच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर तुम्ही पॅनकार्ड (PAN card) दाखवत असताल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर होऊ शकतो. पॅनकार्ड आणि आधार कार्ड या ओळखपत्रांचा सर्वाधिक वापर होतो. पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून जास्त वापर केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. पॅनकार्डचे तुमचे अधिकार काय आहेत ? तुमच्याकडे पॅनकार्ड कोण मागू शकत नाही ? याबद्दल जाणून घेणं महत्वाचे आहे. आर्थिक व्यवहार करतानाच आपल्या पॅनकार्डची माहिती दिली पाहिजे. नुकतंच एका प्रकरणात पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आलंय. हे प्रकरण धानी लोन्स अँड सर्व्हिस लिमिटेड कंपनीशी संबंधित आहे. या डिजिटल लेंडिंग कंपनीनं गैरव्यवहार केलाय. कर्ज घेतलं नसताना देखील अनेकांच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कर्ज घेतल्याची नोंद दिसून आली. लोकांच्या पॅनकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर कर्जाचं वाटप करण्यात आलं. म्हणजेच अनेक जण कर्ज न घेताच कर्जदार झाले. कर्ज घेतल्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअरही खराब झाला. ग्राहकांच्या पॅनकार्डची माहिती चोरून हा गैरव्यवहार करण्यात आलाय.

पॅनकार्डची झेरॉक्स प्रत काढतानाही सावध रहा

या गैरव्यवहाराच्या बळीमध्ये सामान्य नागरिकांसोबतच एका पत्रकाराचा आणि एका अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. त्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फसवणुकी संदर्भात माहिती दिली तसेच तक्रारही नोंदवलीये. पॅनकार्डची झेरॉक्स प्रत काढताना देखील तुम्ही जागरूक राहिले पाहिजे. झेरॉक्स प्रतिवर तुमची सही केलेली असल्यास त्याचा वापर करून क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेतलं जाऊ शकते. अनेक जणांचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यानं ते तुमच्या पॅनकार्डची माहिती चोरून त्यावर कर्ज घेऊ शकतात. पॅनकार्डची सर्व माहिती घेऊन तुमच्या नावानं ITR देखील भरला जाऊ शकतो. तुमच्या जवळील व्यक्तीला तुमची जन्मतारीख आणि आडनाव माहित असल्यास असा गैरव्यवहार होऊ शकतो. अशा जवळच्या व्यक्तींना भरलेला ITR ची प्रत तुमच्याकडे न येता त्या व्यक्तीकडे जाते.

काय काळजी घ्याल?

तुमच्या पॅनकार्डचा दुरुपयोग होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपले पॅनकार्ड दाखवणे टाळा. असे केल्यास तुमचा पॅनकार्डचा डेटा चोरी होणार नाही. कोणी ओळखपत्र मागितले तर पॅनकार्ड ऐवजी मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट दाखवा. तसेच तुम्ही जिथेपण पॅनकार्डचा झरॉक्स काढणार असाल तिथे त्या झेरॉक्स वर तुमची सही तर नाहीना याची खात्री करून घ्या.

संबंधित बातम्या

मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; Bank of Baroda कडून संपत्तीचा लीलाव, खरेदीसाठी कर्जही मिळणार

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....