तुमचे बँकेत एकापेक्षा अधिक खाते आहेत का? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकते मोठे नुकसान

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते (Bank account) असल्यास वापरात नसलेले खाते ताबडतोब बंद करा. याकामात तुम्ही कुचराई केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका (Financial loss) बसू शकतो. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाते असतील तर तुम्ही जागरूक झाले पाहिजे.

तुमचे बँकेत एकापेक्षा अधिक खाते आहेत का? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकते मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:40 AM

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते (Bank account) असल्यास वापरात नसलेले खाते ताबडतोब बंद करा. याकामात तुम्ही कुचराई केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका (Financial loss) बसू शकतो. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाते असतील तर तुम्ही जागरूक झाले पाहिजे. कारण एकापेक्षा जास्त बँक खात्यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो. तुमचे एकापेक्षा जास्त खाते असतील तर अनेकवेळा प्रत्येक खात्यात तुम्ही व्यवहार करतातच असे नाही. बचत किंवा चालू खात्यात एक वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यास खातं निष्क्रिय होते. दोन वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यास खातं डॉरमेट खात्यात (Dormat account) रुपांतर होतं. अशा डॉरमेट खात्याच्या माध्यमातून गौरव्यवहार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खाते डॉरमेट होण्याच्या आधिच ते बंद करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. एकापेक्षा अधिक खाते असल्याचा आणखी एक महत्त्वाचा तोटा म्हणजे आयकर रिटर्न भरताना तुमचा गोंधळ उडतो. रिटर्न भरताना काही चूक झाल्यास तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येण्याची शक्यता असते. एका पेक्षा अधिक बँक खाते असल्यास काय नुकसान होऊ शकते त्याबद्दल जाणून घेऊयात.

एकापेक्षा जास्त खाते असल्यानं कोणता तोटा होतो?

एकापेक्षा जास्त खात्यांमुळे शुल्क जास्त द्यावं लागतं प्रत्येक खात्यात किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) ठेवणं बंधनकारक बँकेच्या सुविधांसाठी जास्त शुल्क भरावं लागतं किमान रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जातो जर तुम्ही सतत दंड भरल्यास सिबिल स्कोअर खराब होतो क्रेडिट स्कोअर खराब झाल्यास कर्जही मिळत नाही आयकर रिटर्न भरताना प्रत्येक बँक खात्याची आयएफसी कोडची माहिती नमूद करावी लागते आर्थिक वर्षात बचत खात्यांवरील कमाई आणि इतर व्यवहारांची माहिती द्यावी लागते अनेक बॅकांत खाते असल्यास आयकर रिटर्न भरण्यात अडचणी निर्माण होतात रिटर्न भरताना काही चूक झाल्यास नोटीसही येते

असं बंद करा आपलं बँक खातं

तुमचे जर एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर त्यातील सर्व बंद करून एकच खाते ठेवा. किंवा फारतर तुम्ही दोन खाते ठेऊ शकता. बाकीचे बँक खाते बंद करण्यासाठी संबंधित बँकेत जा. जे खाते बंद करायचे आहे, त्या खात्यात तुमची काही रक्कम शिल्लक आहे का ते चेक करा. रक्कम असेल तर ती काढून घ्या. त्यानंतर ते बँक खाते बंद करण्यासाठी रितसर बँकेत अर्ज करा. तुम्ही हे खाते का बंद करत आहात त्याचे कारण या अर्जात नमूद करा. अर्ज केल्यानंतर तुमचे खाते बंद होते.

संबंधित बातम्या

आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!

अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?

महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....