Aadhaar : भाडेकरुच्या आधार कार्डवर नाही विश्वास, मिनिटात करा व्हेरिफाय..एवढी सोपी आहे प्रक्रिया..नाही तर होईल मनस्ताप

Aadhaar : बोगस आधार कार्ड विरोधात मोहिम सुरु असली तरी ते तुम्हाला फसविण्यासाठी त्याचा वापर होतोच..

Aadhaar : भाडेकरुच्या आधार कार्डवर नाही विश्वास, मिनिटात करा व्हेरिफाय..एवढी सोपी आहे प्रक्रिया..नाही तर होईल मनस्ताप
मिनिटात ओळखा बोगस आधार कार्डImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 7:24 PM

नवी दिल्ली : सध्या भारतात ओळख पटविण्यासाठी आधार कार्डचा (Aadhaar Card) सर्रास वापर होतो. कोणत्याही कामासाठी आधार हा मजबूत पुरावा समजण्यात येतो. आधार कार्डचा वापर आता सर्वमान्य झाला आहे. पण आधार बाबत एक मोठा धोका अजूनही सतावतो, तो म्हणजे बोगस आधार कार्डचा (Bogus Aadhaar Card) . कारण कितीही मोहिम चालविली तरी देशात बोगस आधार कार्ड सापडतेच. अशावेळी तुमच्या भाडेकरूच्या (Tenant) आधार कार्डवर तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर या सोप्या पद्धतीने त्याचा खरेखोटेपणा तपासू शकता.

अनेकदा आपण आधारकार्ड न तपासताच वरवर बघून त्याची खात्री पटल्याचे भासवतो. पण आधार कार्डचा 12 अंक हाच आधार कार्डचा खरे खोटेपणाचा आधार आहे. हा क्रमांक केवळ एकदाच देण्यात येतो.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा (UIDAI) दावा ऐकून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. प्राधिकरणानुसार, 12 अंकी आधार कार्ड असले तरी, प्रत्येक 12 अंक म्हणजे काही आधार कार्ड नाही. मिळाला की नाही धक्का.

हे सुद्धा वाचा

प्राधिकरणाच्या दाव्यानुसार, एखाद्याने आधार कार्ड दिले तर ते खरे की खोटे हे तपासण्यासाठी या 12 अंकाचा वापर करता येतो. 12 अंकाचा पडताळा तु्म्ही घेतला की, तुम्हाला आधार कार्डच्या खरेपणाची ओळख पटते.

तुम्ही दुकान, घर, भाड्याने देतात. तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला आधार कार्डची एक प्रत थोपवून मोकळी होते. तुम्हाला ही त्याचावर विश्वास बसतो, कारण प्रत दिलेली असल्याने तुमचा विश्वास बसतो. येथेच तुमची चूक होते.

जर आधारबाबत शंका असल्यास तुम्हाला आधार व्हेरिफाय करता येते. त्यासाठी UIDAI ने सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार, तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर 12 अंकावरुन खात्री करता येते.

अथवा तुम्हाला mAadhaar हे अॅप डाऊनलोड करुन कोणतेही आधार कार्ड व्हेरिफाय करता येते. प्रत्येक आधार कार्डवर क्विक रिस्पॉन्स कोड असतो. तो स्कॅन केल्यावर आधार कार्ड व्हेरिफाय होते.

Aadhaar QR Scanner App याद्वारे ही तुम्हाला कोणाचेही आधार कार्ड स्कॅन करुन व्हेरिफाय करता येते. त्याआधारे तुम्हाला आधारकार्ड बोगस आहे की नाही याची खात्री करुन घेता येते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.