डॉमिनोज कंपनीचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या घरी पिझ्झा कसा पोहोचणार?

Dominos | केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईक्स वापरण्याचा विचार करत आहेत. यासाठी आगामी काळात देशभरात चार्जिंग स्टेशन्सची संख्याही वाढवली जाईल.

डॉमिनोज कंपनीचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या घरी पिझ्झा कसा पोहोचणार?
डॉमिनोज
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 10:34 AM

मुंबई: डॉमिनोज या आघाडीच्या पिझ्झा कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉईजना पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक बाईक्स देण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉमिनोजने रिवोल्ट मोटर्स या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. डॉमिोनजने या कंपनीच्या 300 ई-बाईक्स खरेदी केल्या आहेत. लवकरच या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या बाईक्सची जागा घेतील.

गेल्या काही दिवसांपासून डॉमिनोजकडून यासाठी चाचण्या सुरु होत्या. या इलेक्ट्रिक बाईक्समुळे प्रदूषण आणि इंधनावरील खर्च कमी होईल, असे रिवोल्ट मोटर्सच्या व्यापार प्रमुख अंजली रत्तन यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईक्स वापरण्याचा विचार करत आहेत. यासाठी आगामी काळात देशभरात चार्जिंग स्टेशन्सची संख्याही वाढवली जाईल.

इलेक्ट्रिक बाईक्समुळे कंपन्यांचा फायदा

साधारण बाईक्सच्या तुलनेत ई-बाईक्सचा उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेत जास्तीत जास्त ई-बाईक्स आणण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे खर्चात बचत होते. त्यामुळे डॉमिनोजसारख्या कंपन्या या धोरणाचा लाभ उठवू पाहत आहेत. जेणेकरून इंधनावरील पैशात बचत होईल.

क्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल.

कोणत्या देशात वापरले जाते फ्लेक्स-फ्यूएल इंजिन?

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.