WhatsApp Numbers : बातमी एकदम कामाची, लगेचच सेव्ह करा हे व्हॉट्सॲप नंबर, घरबसल्या होतील ही कामे झटपट

WhatsApp Numbers : डिजिटल युगाकडे आपली वाटचाल सुरु आहे. मोबाईलवरच अनेक सेवा आता उपलब्ध आहे. तेव्हा या सेवांसाठी हे व्हॉट्सॲप नंबर जवळ असणे आवश्यक आहे.

WhatsApp Numbers : बातमी एकदम कामाची, लगेचच सेव्ह करा हे व्हॉट्सॲप नंबर, घरबसल्या होतील ही कामे झटपट
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 2:08 PM

नवी दिल्ली : आपण वेगाने डिजिटल युगात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक कामे घरबसल्या सहज एका क्लिकवर होत आहे. यामधील काही कामे तर व्हॉट्सॲपमुळे (WhatsApp Services) अगदी चुटकीसरशी होतात. पण हे कस्टमर सर्व्हिसेस नंबर तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. हे मोबाईल क्रमांक तुम्ही जतन करुन ठेवा. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या बँकिंग (Banking) आणि गॅस सिलेंडरची (Gas Cylinder) सेवा मिळेल. व्हॉट्सअप केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नाही. मोठ्या कंपन्यांसाठी उत्पादन आणि सेवा देण्याचे माध्यम झाले आहे. त्याचा वापर करुन तुम्हाला अनेक सेवा सहज उपलब्ध होतील.

व्हॉट्सॲपवर सहज कर्ज IIFL फायनान्स कंपनी व्हाट्सअपवर ग्राहकांना त्वरीत कर्ज देणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. व्यावसायिक कारणासाठी, लघुउद्योगासाठी हे कर्ज देण्याची तयारी या वित्तीय कंपनीने केली आहे. अशा प्रकारे व्यावसायिक कर्ज, एमएसएमई कर्ज उद्योगांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्ज करण्यापासून, ते मंजूर करणे आणि पैसा हस्तांतरीत करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. भारतातील 450 दशलक्षहून अधिक युझर्संना आयआयएफएल फायनान्स, 24×7 एंड-टू-एंड डिजिटल लोनची सुविधा देते.

एआई-बॉट विचारेल प्रश्न व्हाट्सअप कर्जासाठी एक कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होईल. त्याला एआई-बॉट असे म्हणतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर, तो योग्य वाटल्यास, तुम्ही पात्र ठरल्यास, लागलीच कर्ज मंजूर होईल. हे कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअपक्रमांकावर “हाय” टाईप करुन पाठवावे लागेल. ही संपूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया आहे. आयआयएफएल फायनान्स सध्या व्हॉट्सअप कर्ज चॅनलद्वारे 1 लाख एमएसएमई क्रेडिट माहिती सेवा देऊ शकते.

हे सुद्धा वाचा

छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुविधा आयआयएफल फायनान्स खास करुन छोटे व्यापारी, व्यावसायिकांसाठी ही सुविधा देत आहे. हाच वर्ग त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. बिझनेस हेड भारत अग्रवाल यांनी ही प्रक्रिया पेपरलेस असून कर्ज वितरण ही अत्यंत सुलभ असल्याचा दावा केला आहे.

गॅस सिलेंडर बुकिंग जर तुम्ही बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये 1800224344 हा क्रमांक जतन करु ठेवा. या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सॲप सेवांचा लाभ घेता येईल. इंडेनच्या (Indane) ग्राहकांनी 7718955555 हा क्रमांक सेव्ह करुन ठेवा. त्यांना या क्रमांकावर व्हॉट्सॲप सेवांचा लाभ घेता येईल. तर एचपीच्या (HP) ग्राहकांनी 9222201222 हा मोबाईल क्रमांक सेव्ह करावा. त्यांना या मदतीने सिलेंडर बुकिंग करता येईल.

बँकिंग सेवा एका क्लिकवर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या (SBI) बँकिंग सेवा व्हॉट्सॲप वर सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी 9022690226 नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागतो. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) चॅट बँकिंगसाठी व्हॉट्सॲपची सेवा 7070022222 या क्रमांकावर मिळेल. आयसीआयसीआय बँकेच्या ( ICICI Bank) ग्राहकांना व्हॉट्सॲपची सेवा 8640086400 या क्रमांकावर मिळेल. कोटक महिंद्रा (Kotak Mahindra Hello) सर्व्हिससाठी 9718566655 नंबर वापरता येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.