AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jandhan Yojana : बॅलन्स नसताना मिळेल पैसा! हे खाते आहे का तुमच्याकडे

Jandhan Yojana : पंतप्रधान जनधन योजनेत तुम्हाला झिरो बॅलन्स खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला खात्यात पैसे ठेवावे लागत नाही. जनधन योजनेत तुम्हाला अनेक सुविधा पण मिळतात. या योजनेत खातेदाराला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.

Jandhan Yojana : बॅलन्स नसताना मिळेल पैसा! हे खाते आहे का तुमच्याकडे
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 4:47 PM

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान जन धन योजनेतंर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) बँक खाते उघडले जाते. या खात्यात खातेदाराला अनेक बँकिग सुविधा मिळतात. यामध्ये चेक बुक, पासबुक, अपघात विमा अशा सुविधा मिळतात. पंतप्रधान जनधन योजनेच्या (PM Jan Dhan Yojana) खात्यात रक्कम नसली तरी तुम्हाला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची (Overdraft) सुविधा देण्यात आली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्यात आली. खातेदाराला खात्यात पैसे नसतानाही ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. त्याला खात्यातून पैसा काढता येतो.

ओव्हरड्राफ्टची सुविधा

जन धन योजनेत झिरो बॅलेन्सवर खाते उघडता येते. या खात्यात खात्यात कमीत कमी बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, दंड ही देण्यात येत नाही.

हे सुद्धा वाचा

ओव्हरड्राफ्टची मर्यादा किती?

जन धन खात्यात शिल्लक नसेल तरी ग्राहकाला, खातेदाराला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. पण त्यासाठी एक अट आहे. जन धन खाते उघडून कमीत कमी सहा महिने झालेले असणे आवश्यक आहे. तितके जुने तुमचे खाते असावे. त्यानंतर तुम्हाला गरज असेल तेव्हा 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट रुपाने मिळविता येतात. तर खाते उघडल्यानंतर लागलीच 2000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढता येतो.

मिळतात या सुविधा

  1. जन धन योजनेतंर्गत 10 वर्षाखालील मुलालाही खाते उघडता येते
  2. रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते
  3. 30 हजार रुपयांचा आयुर्विमा आणि ठेवींवरील व्याज मिळते
  4. 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते
  5. पीएम जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडता येते
  6. खात्यात शिल्लकी ठेवण्याची गरज नाही. बॅलन्स नसले तरी खाते एक्टीव्ह राहते

योजनेत केला होता बदल

या योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने (Central Government) 2018 मध्ये अधिक सुविधा आणि लाभांसह ही योजना पुन्हा नव्याने सादर केली. या योजनेत कोणताही भारतीय नागरीक खाते उघडू शकतो.

कोणती कागदपत्रे गरजेची

  1. खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
  2. यापैकी एकही पुराव नसला तरी खाते उघडता येते.
  3. बँक अधिकाऱ्यासमोर सेल्फ अटेस्टेड फोटो आणि स्वाक्षरी करुन खाते उघडता येते.
  4. खाते उघडण्यासाठी कुठलेही शुल्क नाही.

कसे उघडता येईल खाते

  • भारतीय नागरिकाना कोणत्या बँकेत जाऊन खाते उघडता येते
  • बँकेच्या सेवा केंद्रात पण हे खाते उघडता येते
  • खाते उघडण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो
  • मोबाईल क्रमांक, बँकेचे व ब्रँचचे नाव, अर्जदाराचा पत्ता असा तपशील द्यावा लागतो
  • बँकेतील सामान्य खाते जन धन खात्यात हस्तांतरीत करता येते

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.