Income Tax Return : चुकूनही करु नका या चुका, ITR भरताना काय नाही करायचे ते जाणून घ्या

Income Tax Return : प्राप्तिकर रिटर्न भरताना तुम्हाला चुका टाळणे महत्वाचे आहे. नाहीतर डोक्याला मनस्ताप होतो. तुम्हाला पुन्हा आयटीआर फाईल करावा लागेल. दंड भरावे लागेल. त्यामुळे या चुका टाळल्या तर पुढील अडचणींचा सामना करावा लागत नाही.

Income Tax Return : चुकूनही करु नका या चुका, ITR भरताना काय नाही करायचे ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 4:34 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै आहे. प्राप्तिकर विभागाने रिटर्न भरण्याबाबत एक ट्विट केले आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 1 कोटीचा आकडा अवघ्या 12 दिवसांपूर्वीच पार झाला आहे. करदात्यांना तातडीने आयटीआर भरण्याचे आवाहन विभागाने केले आहे. करदात्यांनी त्यासाठी अंतिम मुदतची वाट पाहु नये. लवकरात लवकर करदात्यांनी त्यांचे प्राप्तिकर रिटर्न जमा करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. प्राप्तिकर रिटर्न भरताना तुम्हाला चुका टाळणे महत्वाचे आहे. नाहीतर डोक्याला मनस्ताप होतो. तुम्हाला पुन्हा आयटीआर फाईल करावा लागेल. दंड भरावे लागेल. त्यामुळे या चुका टाळल्या तर पुढील अडचणींचा सामना करावा लागत नाही.

मुदतीत भरा आयटीआर निश्चित मुदतीत आयटीआर जमा न करणे ही मोठी चूक ठरु शकते. आयटीआर जमा करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. या अंतिम मुदतीच्या आत आयटीआर दाखल केले नाही तर तुम्हाला दंडाचा भूर्दंड सहन करावा लागू शकतो. हे शुल्क 5000 रुपयांपर्यंत असू शकते.

आयटीआर दाखल न करणे आयटीआर दाखल न करणे तुमच्यासाठी मोठी समस्या, अडचण ठरु शकते. आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला भूर्दंड लागू शकतो.

हे सुद्धा वाचा

चुकीचा आयटीआर फॉर्म प्राप्तिकर रिटर्न दाखल करताना, करदाते कायम ही चूक करतात. ते चुकीचा फॉर्म निवडतात. तो भरुन जमा करतात. मग पुन्हा मनस्ताप होतो.

बँक खात्याचे सत्यापन इनकम टॅक्स रिटर्न दाखल करताना तुम्हाला बँक खाते सत्यपित म्हणजे व्हेरिफाय करावे लागते. नाहीतर रिटर्नची रक्कम अडकते. तसेच इतर अनेक अडचणी येतात.

आयटीआर व्हेरिफाय करण्याचा विसर ही चूक करदात्यांना तेव्हा लक्षात, जेव्हा प्राप्तिकर खात्याकडून नोटीस मिळते. त्यामुळे आयटीआर व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. नाही तर डोक्याला ताप होऊ शकतो. सध्या 30 दिवसांत आयटीआर व्हेरिफाय करता येतो.

वैयक्तिक माहिती अनेकदा आयकर दाते त्यांची वैयक्तिक माहिती चुकीची देतात. वैयक्तिक माहिती चुकीची दिल्यास व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हालाच अडचण येते. आयकर विभागाकडून नोटीस येते.

चुकीचे मुल्यांकन वर्ष मूल्यांकन वर्ष, कर निर्धारण वर्ष हे आर्थिक वर्षानंतरचे वर्ष असते. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना आर्थिक वर्षानंतर असेसमेंट ईयरची निवड करणे आवश्यक आहे. सध्या कर भरणा करताना मुल्यांकन वर्ष 2023-24 वर्ष निवडावे लागेल.

उत्पन्न लपविणे आयकर रिटर्न दाखल करताना तुम्ही कमाई करत असलेले उत्पन्नाचे सर्व स्त्रोत दाखविणे आवश्यक आहे. तुम्ही वेतना व्यतिरिक्त कमाई करत असाल तर ती माहिती देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.