सरकारचा मोठा निर्णय, दिवाळी काळातच पैशांशी संबंधित कुठले नियम बदलणार?
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियम बदलले जातात. सरकारपासून प्रायवेट कंपन्या नियमांमध्ये बदल करतात. त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य माणसावर होतो. दिवाळी काळात कोणते नियम बदलले जाणार आहेत, जाणून घ्या.
ऑक्टोंबर महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. महाराष्ट्रात दिवाळीचा सण सुरु झालाय. उत्तरेत 31 ऑक्टोंबरला दिवाळी साजरी होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पैशाशी संबंधित नियम बदलणार आहेत. यात गॅल सिलेंडरच्या किंमतीपासून म्यूचुअल फंड शेयर बाजारापर्यंत नियम बदलले जाणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? ते जाणून घ्या. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियमांमध्ये बदल होतो. सरकारपासून प्रायवेट कंपन्यांमध्ये नियम बदलले जातात. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसावर होतो.
गॅस सिलिंडरचे दर
सर्वसाधारणपणे सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात बदल करते. 1 नोव्हेंबरला गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होऊ शकतो.
म्यूचुअल फंड्स नियम
जर तुम्ही शेयर बाजार किंवा म्यूचुअल फंडमधून कमाई करत असाल, तर या नियमाचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. सेबीने म्यूचुअल फंड्समध्ये इनसाइडर ट्रेडिंग रोखण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत. हे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार. सेबीने म्यूचुअल फंड यूनिट्सचा इनसाइडर ट्रेडिंग नियमात समावेश केला आहे.
क्रेडिट कार्ड नियम
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक स्टेटमेंट सायकलद्वारे 50 हजार रुपयापेक्षा जास्तच्या यूटिलिटी बिल पेमेंटवर आता 1 परसेंट एक्सट्रा चार्ज लावणार आहे. एसबीआयने शौर्य/डिफेंस क्रेडिट कार्ड सोडून सर्व अनसिक्योर्ड क्रेडिट कार्डच्या फायनान्स चार्जमध्ये बदल केलाय.
मेसेज ट्रेसबिलिटी
त्याशिवाय 1 नोव्हेंबरपासून मॅसेज ट्रेसेबिलिटी नियम सुद्धा लागू होणार आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना मॅसेज ट्रेसेबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे आता कॉल्ससोबत मेसेजची सुद्धा चौकशी होईल. सरकारने हा नियम फेक कॉल्स आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी घेतला आहे. यात स्पॅम आणि फेक कॉल्स काही कीवर्ड्सवरुन ओळखण्यात येतील.