E-Shram portal : 94 टक्के कामगारांचे मासिक उत्पन्न 10 हजारांपेक्षा कमी; नोंदणी करणाऱ्यांना मिळतोय लाखो रुपयांचा फायदा

ई-श्रम पोर्टलच्या वतीने नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार देशातील तब्बल 94 टक्के असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे मासिक उत्पन्न हे दहा हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

E-Shram portal : 94 टक्के कामगारांचे मासिक उत्पन्न 10 हजारांपेक्षा कमी; नोंदणी करणाऱ्यांना मिळतोय लाखो रुपयांचा फायदा
Image Credit source: google
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:07 PM

नवी दिल्ली : असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम या पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी (Workers) नोंदणी केल्यानंतर त्यांना शासनाच्या (Central Government) वतीने विविध लाभ मिळतात. ई-श्रम पोर्टलच्या (E-Shram portal) वतीने नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 27.69 कोटी कामगारांपैकी तब्बल 94 टक्के कामगारांची महिन्याची कमाई ही दहा हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 92 टक्के कामगारांची दर महिना कमाई ही दहा हजार रुपयांपेक्षा कमी होती. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून, हीच संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे. ई श्रम पोर्टवर ज्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी नोदंणी केली आहे, त्यातील जवळपास 74 टक्के कामगार हे अनुसूचित जाती ‘एससी’, अनुसूचित जमाती ‘एसटी’ आणि ओबीसीमधील आहेत.

ई-श्रम पोर्टल सुरू करण्याचा उद्देश

ई-श्रम पोर्टलची सुरुवात 26 ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आली. देशात जेवढे असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत, त्यांचा एक मजबूत असा डेटा बेस तयार करण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची माहिती घेऊन त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचा या पोर्टलचा महत्त्वाचा उद्देश आहे. ई-श्रम पोर्टकडून मिळालेल्या नव्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीमध्ये जवळपास 27.69 कोटी असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी नोंदणी केली आहे. यातील जवळपास 94 टक्के कामगारांचे महिन्याचे उत्पन्न हे दहा हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 92 टक्के इतके होते.

कोणत्या समाजाचे किती कामगार

ई-श्रम पोर्टलकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार या पोर्टवर नोंदणी केलेल्या एकूण असंघटीत कामगारांपैकीस 74 टक्के कामगार हे अनुसूचित जाती ‘एससी’, अनुसूचित जमाती ‘एसटी’ आणि ओबीसीमधील आहेत. यामध्ये ओबीसीचा सर्वाधिक वाटा असून जवळपास 45.32 टक्के कामगार हे ओबीसी आहेत. 20.95 टक्के एससी तर 8.17 टक्के एसटी कामगारांचा समावेश आहे. उर्वरीत 25.56 टक्के संख्या ही सर्वसामान्य कामगारांची आहे.

हे सुद्धा वाचा

नोंदनी केल्यास मिळणारे फायदे

जे असंघटीत कामगार ई-श्रम पोर्टवर नोंदणी करतात त्यांना केंद्र सरकारच्या वतीने अनेक फायदे मिळतात. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच मिळते. जर समजा एखाद्या दुर्घटनेत संबंधित कामगाराचा मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे दिव्यांग झाला तर त्याच्या कुंटुंबीयांना या योजनेंतर्गत दोन लाखांची मदत मिळते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.