Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

अंमलबजावणी संचालनालयाने अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच फ्युचर ग्रुपच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश
अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 5:08 PM

नवी दिल्ली : फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने Amazon India आणि Future Group च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. यामध्ये Amazon India चे कंट्री हेड अमित अग्रवाल यांचाही समावेश आहे. दोन ग्रुपधील वादग्रस्त करार फेमा चौकशीच्या संदर्भात दोन्ही अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगितल्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच फ्युचर ग्रुपच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाणिज्य मंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाला दिल्या सूचना

वाणिज्य मंत्रालयाने ED ला मल्टी-ब्रँड रिटेल ट्रेडिंगसाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या देशातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध “आवश्यक पावले” उचलण्यास सांगितले होते. याशिवाय दिल्ली हायकोर्टाने अॅमेझॉनबाबतही जोरदार टीका केली. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने फेमाच्या विविध कलमांतर्गत तपास सुरू केला होता.

उच्च न्यायालयाने म्हटले होते की, अमेरिकन कंपनी अॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपच्या असूचीबद्ध घटकासह काही करारांद्वारे फ्यूचर रिटेलवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता, जे FEMA आणि थेट विदेशी गुंतवणूक (FDI) नियमांचे उल्लंघन करणारे मानले जाईल. या प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही कंपन्यांच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले आहे जेणेकरून तपास पुढे नेला जाईल.

अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याकडून समन्स मिळाल्याची पुष्टी

Amazon India च्या प्रवक्त्याने अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स मिळाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, कंपनी याची समीक्षा करत आहे आणि निर्धारित वेळेत आवश्यक पावले उचलली जातील. त्याचबरोबर फ्युचर ग्रुपने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्युचर रिटेलच्या संभाव्य विक्रीवरून दोन्ही कंपन्या कायदेशीर लढाईत अडकल्या आहेत. अॅमेझॉनचे म्हणणे आहे की, रिलायन्स रिटेलला फ्युचर रिटेल विकण्याचा करार 2019 मध्ये झालेल्या गुंतवणूक कराराचे उल्लंघन करतो. (ED summons senior executives of Amazon and Future Group)

इतर बातम्या

गृहकर्ज घेताय? मग कर्ज घेण्यापूर्वी अवश्य तपासा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय? सर्व काही जाणून घ्या कोणाला होतो याचा फायदा

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध.
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.