Edible Oil latest price: आयात शुल्कात घट होऊनही पामतेल महागच, जूनमध्ये आयातीत 24 टक्क्यांची घसरण
Edible Oil latest price | गेल्या जून महिन्यात भारताकडून 5,64,839 टन पामतेलाची आयात करण्यात आली होती. तर मे 2020 मध्ये 7,69,602 टन पामतेलाची आयात झाली होती. मात्र, यंदा जून महिन्यात हेच प्रमाण 17 टक्क्यांनी घटले. भारत हा जगातील वनस्पती तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. यामध्ये पामतेलाचा हिस्सा 60 टक्के इतका आहे.
नवी दिल्ली: देशांतर्गत बाजारपेठेत गरजेपेक्षा अधिक साठा असल्याने जून महिन्यात भारताकडून होणाऱ्या पामतेलाच्या आयातीमध्ये 24 टक्क्यांची घट झाली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच खाद्यतेलांच्या आयात शुल्कात कपात केली होती. मात्र, याचा उलट परिणाम पाहायला मिळाला होता. आयातशुल्क घटल्याने पामतेलाची मागणी अधिक वाढून दर 6 टक्क्यांनी वाढले होते.
गेल्या जून महिन्यात भारताकडून 5,64,839 टन पामतेलाची आयात करण्यात आली होती. तर मे 2020 मध्ये 7,69,602 टन पामतेलाची आयात झाली होती. मात्र, यंदा जून महिन्यात हेच प्रमाण 17 टक्क्यांनी घटले. भारत हा जगातील वनस्पती तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. यामध्ये पामतेलाचा हिस्सा 60 टक्के इतका आहे.
खाद्यतेलाच्या आयातशुल्कात घट
जून महिन्यात महागाईचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे 86 डॉलर्सनी कमी करण्यात आले होती. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन 37 डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे 112 डॉलर्सनी घटवण्यात आले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना याचा विशेष फायदा होताना दिसत नाही.
जेवणासाठी कोणते खाद्यतेल चांगले?
ऑलिव्ह ऑईल
कुकिंग एक्स्पर्ट स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल सर्वात निरोगी मानतात. विशेषत: अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये ते शिजवलेले अन्न सर्वात चांगले आहे, कारण ते पूर्णपणे शुद्ध असते. अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलवर प्रक्रिया आणि शुद्धीकरण केले जात नाही. ज्यामुळे त्याची गुणवत्ता खूप चांगली आहे. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटची मात्रा आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसची मात्रा चांगली असते, जे हृदयासाठी चांगले असतात.
खोबरेल तेल
नारळ तेल अर्थात खोबरेल तेलात हाय सॅच्युरेटेड फॅटची मात्र अधिक असते. म्हणून या तेलाच्या वापराबद्दल भिन्न मते आहेत. सॅच्युरेटेड फॅट आरोग्यासाठी चांगले नसते, परंतु काही तज्ज्ञांच्या मते यात निरोगी पदार्थ शिजवून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करता येते. कुकिंग एक्स्पर्ट लिज वेनंडी म्हणतात, ‘आपल्या शरीरालाही काही प्रमाणात संतृप्त चरबीची आवश्यकता असते. म्हणून त्याचा वापर कमी प्रमाणात केला जाऊ शकतो.’(Benefits and side effects of Cooking oil)
सूर्यफूल तेल
सूर्यफूल तेलामध्ये व्हिटामिन ई जास्त प्रमाणात आढळते. एक चमचे सूर्यफूल तेलामध्ये 28 टक्के व्हिटामिन ई असते. त्याला चव नाही, म्हणून या तेलात शिजवलेल्या अन्नाला तेलाची चव येत नाही. या तेलात ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात. ओमेगा-6 फॅटी अॅसिडस् शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु अत्यधिक वापरामुळे शरीरात जळजळ होऊ शकते.
व्हेजिटेबल तेल
व्हेजिटेबल तेल वनस्पतीद्वारे मिळवले जाते. या तेलाचा फायदा त्यात कोणत्या प्रकारचे पदार्थ शिजवले जातात त्यावर अवलंबून आहे. हॉवर्ड यांच्या मते, व्हेजिटेबल तेलावर प्रक्रिया केली जाते आणि त्यास परिष्कृत केले जाते ज्यामुळे त्याची चव आणि पोषण कमी आहे. हे तेल शरीरातील चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉल दरम्यान संतुलन राखते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचते.
शेंगदाणा तेल
शेंगदाणा तेलातील आहार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याची चवही चांगली आहे. शेंगदाणा तेलाचे बरेच प्रकार आहेत. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात आहे. चवीबरोबरच त्याचा सुगंधही चांगली आहे.
संबंधित बातम्या:
आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महागाईची फोडणी तोंडाची चव घालवणार; खाद्यतेल महागले; मोहरीचाही भाव वाढणार
मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता