नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ही चूक करु नये, नाहीतर अडकून पडतो पीएफचा सगळा पैसा, समजून घ्या महत्वाचा नियम

EPF Guidelines : EPF-EPS खातेधारकाला लग्न झाल्यानंतर त्याने आधी केलेलं नामनिर्देशन रद्द होतं. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर खातेधारकाला पुन्हा एकदा EPF-EPS खात्यात आपल्या नॉमीनीचं नाव पुन्हा भरावं लागतं.

नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ही चूक करु नये, नाहीतर अडकून पडतो पीएफचा सगळा पैसा, समजून घ्या महत्वाचा नियम
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 6:56 PM

भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रोव्हिडंट फंड हा केवळ एक आर्थिक सपोर्ट नाही, तर नोकरी दरम्यान खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला त्यातून सावरण्यास मदत करणारं एक आर्थिक अस्र आहे. जर EPFO खातेधारकाने नॉमिनेशन दस्तऐवजांवर कुटुंबाला नामनिर्देशित केलं तर त्याच्या कुटुंबाला याचे सगळे लाभ मिळतात. मात्र जर यात एक चूक केली तर कुटुंबाला नुकसानही होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाल EPFO नियमाबद्दल सांगत आहोत. ( Employee need to declare a nominee in the provident fund after marriage, otherwise all PF money will be freeze, EPFO Rules )

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजना 1952 नुसार, EPF-EPS खातेधारकाला लग्न झाल्यानंतर त्याने आधी केलेलं नामनिर्देशन रद्द होतं. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर खातेधारकाला पुन्हा एकदा EPF-EPS खात्यात आपल्या नॉमीनीचं नाव पुन्हा भरावं लागतं. पुरुषांसाठी त्यांची पत्नी तर महिलांसाठी त्यांचा पती या खात्याचा नॉमिनी असतो.

लग्नानंतर रद्द होतं नॉमिनेशन

खातेधारकाच्या लग्नानंतर ईपीएफओमध्ये नामांकन करणं गरजेचं असतं, असं केलं नाही. आणि दुर्दैवाने त्या काळात खातेदारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला वा कुटुंबाला त्याच्या ईपीएफओमध्ये असलेल्या पैशांवर दावा करता येत नाही. त्यामुळे, आठवणीने लग्न झाल्यानंतर ईपीएफओ खात्यात नव्याने नामांकन करणं गरजेचं आहे.

जर समजा ईपीएफओ खातेधारकाला कुटुंब नसेल तर तो कुणाही व्यक्तीला आपला नॉमिनी निवडू शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही जर त्या व्यक्तीचं लग्न झालं, तर त्याने आधी केलेलं नॉमिनेशन रद्द होतं, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा आपल्या पत्नी वा पतीला नॉमिनेट करावं लागतं. जर नॉमिनेशन केलं नसेल, तर पीएफची रक्कम कुटुंबात समसमान वाटली जाते आणि खातेधारकाचं लग्न झालं नसेल तर ती रक्कम आई-वडीलांना दिली जाते.

अशाप्रकारे करा EPF/EPS चं ई-नॉमिनेशन

तुम्हाला नॉमिनेशन करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरबसल्या एका क्लिकवर तुम्ही हे नॉमिनेशन करु शकता.

  •  सर्वात आधी तुम्हाला EPFO ची ऑफिशियल वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ जावं लागेल
  •  वेबसाईटवरच्या ‘Services’ पर्यायावर क्लिक करा आणि त्याच्यातील ‘For Employees’ हा पर्याय निवडा.
  •  आता तुम्ही एका नवीन पेजवर याल, तिथे ‘Member UAN/Online Service’ हा पर्याय तुम्हाला दिसेल
  •  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यातील Manage Tab मधील E-Nomination वर क्लिक करा.
  • यानंतर स्क्रिनवर Provide Details हा टॅब ओपन होईल त्यात Save क्लिक करा.
  • आता फैमिली डिक्लयरेशनसाठी Yes वर क्लिक करा, आणि Add family details वर क्लिक करा.
  • आता इथं किती रक्कम कुणाला द्यायची याची टक्केवारी देण्यासाठी Nomination Details वर क्लिक करा, त्यांनतर Save EPF Nomination वर क्लिक करा
  • आता तुम्हाला OTP करण्यासाठी E-sign वर क्लिक करावं लागेल, आता आधारकार्डवर रजिस्ट्रर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल
  • हा ओटीपी स्क्रिनवर भरा, आणि हे केल्यानंतर तु्म्ही यशस्वीरित्या नॉमिनेशन केलेलं असेल.

हेही वाचा:

Gold Price Update : दिवाळीआधी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत, सध्या सोन्याचे दर स्थिर, सराफा व्यापाऱ्यांचं भाकीत

Post Office RD Scheme : दरमहा 10 हजार पोस्टाच्या या स्किममध्ये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर 16 लाखांचा परतावा

 

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.