मुंबईः वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी होळी सणाच्या आधी एक आनंदाची गोष्ट समजणार आहे, त्यामुळे येणाऱ्या होळीत 15 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे जे कर्मचारी आहेत, ते सप्तरंगी रंगांची उधळण करणार आहेत. कारण जे कर्मचारी 15 हजारपेक्षा जास्त पगार घेत आहेत असे कर्मचारी (Employee) खूप दिवसांपासून जादा पेन्शन योजनेची मागणी करत आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रातील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी EPFO (Employees’ Provident Fund Organization) ही संस्था सेवानिवृत्ती निधीशी संबंधित कार्यरत आहे. आणि हिच संस्था या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा विचार करत आहे, ज्यांचे मासिक मूळ वेतन रु. 15,000 पेक्षा जास्त आहे ते कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) साठी पात्र असणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
सध्या जे संघटित क्षेत्रातील कर्मचारी आहेत ते त्या सर्वांचा अनिवार्यपणे EPS-95 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार (मूलभूत वेतन+महागाई भत्ता (DA)) हा नोकरीवर रुजू होताना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार Employees’ Provident Fund Organization (EPFO) ईपीएफओच्या सदस्यांच्या पगारातील हिस्स्यावर अधिक पेन्शनची मागणी करत आहे. या परिस्थितीत 15 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ पगार असलेल्यांसाठी नवीन पेन्शन योजना किंवा नवीन पेन्शन आणण्याचा प्रस्तावही पुढील महिन्यात होणाऱ्या EPFO च्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार EPFO बाबत सर्व निर्णय घेणारी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) या संस्थेची 11 आणि 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत, 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज दराबाबत (Interest Rate) निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी या बैठकीबाबत माहिती दिली होती की, या बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याज दर निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. हा निर्णय ते यासाठी देऊ शकतात कारण ते सीबीटी या संस्थेचे ते प्रमुखही आहेत. याआधीच्या झालेल्या बैठकीत सीबीटी या संस्थेने 2021 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवीवर 8.5 टक्के व्याज निश्चित केले होते. त्यामुळे होळी सणाच्या आधी होणाऱ्या बैठकीत कामगारांविषयी काय निर्णय घेण्यात येऊल त्याबाबत कामगारवर्गही उत्सुक आहे.
संंबंधित बातम्या
Salary Account | सारखी नोकरी बदलता? जुनं सॅलरी अकाऊंट बंद करायला विसरु नका, नाहीतर…
नोकरी बदलली तरी जुने सॅलरी अकाउंट सुरुच, ही बातमी तुमच्यासाठी, अन्यथा बसेल भुर्दंड