Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या PF खात्यावर व्याज जमा झालंय का? असं तपासा

EPF passbook किंवा PF balance कसा तपासायचा हेआम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या पीएफ मध्ये जमा असलेली रक्कम तपासण्यासाठी खाली दिलेल्या सूचना फॉलो करा.

तुमच्या PF खात्यावर व्याज जमा झालंय का? असं तपासा
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 7:50 PM

मुंबई : तुम्ही जर तुमचा EPFO बॅलेन्स तपासला नसेल तर नक्की तपासून घ्या. कारण केंद्र सरकारने अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांच्या खात्यात पीएफवरील व्याज जमा केले आहे. सरकारने सोमवारी संसदेत माहिती देताना सांगितले की 6 मार्च 2023 पर्यंत 98 टक्के भागधारक कंपन्यांचे व्याज अद्ययावत केले गेले आहे. अशा परिस्थितीत, एकदा तुम्ही तुमचा ईपीएफ शिल्लक तपासा, पीएफवर किती व्याजाचे पैसे आले आहेत ते देखील तपासू शकता.

मिस्ड कॉलद्वारे PF असं तपासा

तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या. रिंगरनंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या EPF खात्याच्या डेटाबद्दल माहिती असलेला एसएमएस मिळेल. त्यात तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक रकमेची माहिती असेल.

एसएमएसद्वारे PF असं तपासा ( PF BALANCE CHECK SMS )

तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता. तुमची पीएफ शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला ईपीएफओला एसएमएस पाठवावा लागेल. 7738299899 वर एसएमएस पाठवून, तुम्ही तुमचा UAN आणि तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक देऊन तुमची शिल्लक तपासू शकता. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक ईपीएफओकडे नोंदणीकृत असावा.

ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन

तुम्ही EPFO ​​साइटवर जाऊन पासबुक तपासू शकता. यासाठी EPFO ​​वेबसाइटवर UAN क्रमांकाने लॉग इन करावे लागेल. UAN हा १२ अंकी क्रमांक आहे जो सर्व EPFO ​​सदस्यांना दिला जातो. ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन यूएएनद्वारे लॉग इन करावे लागेल. तेथे तुम्हाला सदस्य पासबुकवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही तुमचे पासबुक पाहू शकता.

बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...