EPFO कडून 6 कोटी खातेधारकांना सावधानतेचा इशारा; भूलथापांना बळी पडू नका, अन्यथा…
EPFO | फोनवरुन कोणालाही स्वत:च्या पीएफ खात्याचा क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांकाचे तपशील देऊ नयेत. EPFO आपल्या कोणत्याही खातेदाराला अशाप्रकारे फोन करुन तपशील विचारत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई: नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या उतारवयातील आधार मानला जातो. त्यामुळे पीएफची रक्कम गमावणे हा नोकरदारांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या ऑनलाईन खात्यांमधून पैसे लंपास केले जातात.
या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. EPFO कडून ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. खातेधारकांनी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अॅप्लिकेशनवर शेअर करु नये, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच फोनवरुन कोणालाही स्वत:च्या पीएफ खात्याचा क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांकाचे तपशील देऊ नयेत. EPFO आपल्या कोणत्याही खातेदाराला अशाप्रकारे फोन करुन तपशील विचारत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
#EPFO never asks its members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media.#SocialSecurity #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @PIB_India @PIBHindi @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @mygovindia @PTI_News pic.twitter.com/kG6UQ5O3mb
— EPFO (@socialepfo) October 23, 2021
पीएफ व्याजाचे पैसे खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्व नोकरदारांनाही दिवाळीची भेट द्यायचे ठरवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व खातेधारक त्यांच्या खात्यात किती पीएफ पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत.
आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळाले नाहीत पण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम विभागनिहाय जमा केल्यामुळे अजून सर्वांच्या खात्यात पैसा जमा झालेले नाहीत.
संबंधित बातम्या:
राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स
अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा