EPFO कडून सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा; या गोष्टीचं पालन करा, अन्यथा…
PF | नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या उतारवयातील आधार मानला जातो.
मुंबई: भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. EPFO कडून ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. खातेधारकांनी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अॅप्लिकेशनवर शेअर करु नये, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या उतारवयातील आधार मानला जातो. त्यामुळे पीएफची रक्कम गमावणे हा नोकरदारांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या ऑनलाईन खात्यांमधून पैसे लंपास केले जातात. या पार्श्वभूमीवर EPFO ने आपल्या सदस्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
EPFO ने नेमकं काय म्हटलं?
EPFO कडून आपल्या ग्राहकांना खोट्या फोन कॉलसंदर्भात सतर्क करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत अशाप्रकारे फोन कॉलवरून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे पीएफधारकांनी कोणताही फोन आल्यास यूएन क्रमांक (UAN Number), आधार क्रमांक (Aadhaar), पॅनकार्ड (PAN) आणि बँक खात्याचा क्रमांक शेअर करु नये, अशी सूचना दिली आहे.
#EPFO never asks it’s members to share their personal details. Stay alert & beware of fraudsters.#SocialSecurity #PF #ईपीएफ #Employees #Services pic.twitter.com/FOul1jSNnf
— EPFO (@socialepfo) September 6, 2021
खोट्या संकेतस्थळांचा वापर करु नका
याशिवाय, भविष्य निर्वाह निधीसंबंधी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपण अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करत आहोत किंवा नाही, याची खात्री करावी. अन्य़था हॅकर्स तुमच्या पीएफ खात्याचा अॅक्सेस मिळवून त्यामधील पैसे लंपास करु शकतात.
दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात जमा करणार पैसे
गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएफवरील वाढीव व्याजदर आणि महागाई भत्ता (DA) असा दुहेरी फायदा मिळेल. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्रालय हे पैसे नोकदरात आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील कधी दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर
गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यानंतर EPFO कडून पीएफ खात्यावरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला होता. हा गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर ठरला होता. यापूर्वी 208-19 या आर्थिक वर्षात पीएफ खात्याचा व्याजदर 8.65 टक्के इतका होता. तर 2017-18 मध्ये हा व्याजदर 8.55 टक्के इतका होता.
संबंधित बातम्या:
पीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन; जाणून घ्या काय फायदा होणार?
PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?
PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट