PF काढण्यासाठी आता आधारची गरजच नाही, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार सूट, आवश्यक कागदपत्रे कोणती?
EPFO update: पीएफ क्लेमसंदर्भातील नियमात बदल करण्यात आला आहे. आता पीएफ क्लेम करण्यासाठी आधार अनिवार्य नाही. पण, हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी नसल्याची माहिती आहे.
EPFO update : पीएफ क्लेमसंदर्भातील नियमात बदल करण्यात आला आहे. आता पीएफ क्लेम करण्यासाठी आधार अनिवार्य नाही. पण, हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी नसल्याची माहिती आहे. तर काही विशिष्ट श्रेणीतील सदस्यांसाठी ही सूट असणार आहे.
कर्मचाऱ्यांना दावा करणे सोपे
काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी लिंक करण्याच्या सक्तीत ही सूट शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आधार मिळणे अवघड आहे किंवा त्यांना आधारसारखी कागदपत्रे मिळू शकत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना दावा करणे सोपे होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना सूट
कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना या अंतर्गत सूट देण्यात आली आहे. तेही ते कर्मचारी जे भारतात काम करून आपल्या देशात गेले आणि त्यांना आधार कार्ड मिळू शकले नाही. याशिवाय परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय, ज्यांना आधार मिळू शकला नाही.
परदेशात कायमस्वरूपी गेलेले माजी भारतीय नागरिक आणि नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांनाही या अंतर्गत सूट देण्यात आली आहे.
आधारशिवाय पर्याय कोणता?
ईपीएफ आणि एमपी कायद्यांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आधारची अट ठेवण्यात आलेली नाही, जे भारताबाहेर राहतात आणि त्यांच्याकडे आधार नाही. हा बदल लागू झाल्याने ते कर्मचारीही ईपीएफओअंतर्गत दावा करू शकतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यात येणार आहे.
अधिकृत ओळखपत्र कोणते?
ईपीएफओने दुसऱ्या कागदपत्राद्वारे पीएफ क्लेम निकाली काढण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये पडताळणी कागदपत्रांचा समावेश आहे. यात पासपोर्ट, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत ओळखपत्र आहे. पॅन, बँक खात्याचा तपशील आणि इतर पात्रता निकषांद्वारे पडताळणी केली जाईल. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांसाठी मालकाकडून सदस्याची सत्यता पडताळली जाईल.
एकच UAN क्रमांक
ईपीएफओने बनवलेल्या नियमांमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही दाव्याची अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक छाननी केली पाहिजे. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यामार्फत (OIC) ई-ऑफिस फाईलद्वारे मंजुरी आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना एकच UAN क्रमांक राखण्याचा किंवा मागील सेवेच्या नोंदी त्याच UAN नंबरवर हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे क्लेम मिळवणे सोपे जाते.
एक लक्षात घ्या की, कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना या अंतर्गत सूट देण्यात आली आहे. तेही ते कर्मचारी जे भारतात काम करून आपल्या देशात गेले आणि त्यांना आधार कार्ड मिळू शकले नाही. याशिवाय परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय, ज्यांना आधार मिळू शकला नाही. इतर कुणालाही सूट नाही.