कोट्यवधी कर्मचाऱ्यांना EPFO चा धक्का, ही महत्वाची सुविधा बंद
epf account withdrawal rule changed: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 12% पगार ईपीएफ खात्यात जमा होतो. तसेच कंपनीकडूनही 12% रक्कम टाकली जाते. त्यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व निवृत्त होताना पीएफची रक्कम दिली जाते.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (EPFO) स्थापना करण्यात आली. या संस्थेचे सभासद कोट्यवधीमध्ये आहेत. ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून देण्यात येणारी सुविधा आता बंद केली आहे. ईपीएफओने कोविड-19 अॅडवॉन्स सुविधा बंद केली आहे. कोरोना काळात ही नॉन-रिफंडेबल सुविधा सुरु करण्यात आली होती. आता 12 जून 2024 रोजी परिपत्रक काढून अॅडवॉन्स सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
का केली ही सुविधा बंद
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहची तरतूद ईपीएफओ करते. कोरोना काळात ईपीएफओ सदस्यांसाठी नॉन-रिफंडेबल अॅडवॉन्स घेण्याची सुविधा केली होती. आता कोविड-19 महामारी राहिली नाही. यामुळे ही सुविधा तत्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असल्याचे ईपीएफओच्या परीपत्रकात म्हटले आहे. ज्या ट्रस्टकडून ईपीएफओ सुविधा दिली जाते, त्यांच्यासाठीही हा नियम लागू आहे.
जून 2021 कामगार मंत्रालयाने जाहीर केले की EPFO सदस्यांना त्यांच्या EPFO खात्यांमधून दुसरा नॉन-रिफंडेबल ॲडव्हान्स मिळू शकतो. पूर्वी ईपीएफ सदस्यांसाठी फक्त एक वेळ आगाऊ सुविधा होती. EPFO कडून सदस्यांना तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा EPF खात्यात उपलब्ध रकमेच्या 75%, यापैकी जे कमी असेल ती मिळत होती. EPFO ने घर, लग्न आणि शिक्षणाशी संबंधित कामासाठी रक्कम देत होती.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 12% पगार ईपीएफ खात्यात जमा होतो. तसेच कंपनीकडूनही 12% रक्कम टाकली जाते. त्यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व निवृत्त होताना पीएफची रक्कम दिली जाते. पीएफ खातेधारकांनी कोरोना अॅडवॉन्स म्हणून 48,075.75 कोटी रुपये दिले. ईपीएफओ ड्राफ्ट एन्युअल रिपोर्ट 2022-23 मध्ये त्याची माहिती दिली गेली आहे. रिपोर्टनुसार ईपीएफओने 2020-21 मध्ये 17,106.17 कोटी रुपये दिले होते. त्याचा फायदा 69.2 लाख पीएफ खातेधारकांना झाला होता. 2021-22 मध्ये 91.6 लाख खातेधारकांना 19,126.29 लाख कोटी रुपये दिले होते.