AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : नोकरी बदलताना लगेच करा हे काम, नाहीतर येईल ताण

EPFO : प्रोव्हिडंट फंड, खासगी नोकरदारांसाठी बचतीचं माध्यम आहे. अडचणीच्या काळात या फंडातील रक्कम लोकांच्या कामी येते. नोकरी सोडताना ही काळजी घ्या.

EPFO : नोकरी बदलताना लगेच करा हे काम, नाहीतर येईल ताण
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 7:48 PM

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात (Private Sector) काम करणारे पगार वाढीसाठी सातत्याने नोकऱ्या बदलतात. वेतन वाढीसाठी सुरुवातीच्या काळात नोकऱ्या बदलाव्या लागतात. कोविड महामारीनंतर नोकऱ्या बदलण्याचा ट्रेंड वाढला आहे. प्रोव्हिडंट फंड (Provident Fund), खासगी नोकरदारांसाठी बचतीचं माध्यम आहे. अडचणीच्या काळात या फंडातील रक्कम लोकांच्या कामी येते. तुम्ही पण नोकरी बदलत असाल अथवा बदलली असेल तर नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर एक महत्वपूर्ण काम करणे आवश्यक आहे. नोकरी सोडताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर डोक्याला ताप होईल.

खातं करा विलीन प्रत्येक नवी कंपनीमध्ये रुजू होताना जुना UAN क्रमांकाआधारे पीएफ खाते उघडण्यात येते. पण नवीन पीएफ खात्यात जुन्या खात्यातील पीएफ रक्कम जोडता येत नाही. ती रक्कम त्या खात्यात तशीच राहते. त्यामुळे पीएफधारकाला ईपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन Account Merge करण्याची विनंती करावी लागते.

खातं ऑनलाईन करा मर्ज ईपीएफ खाते मर्ज झाल्यानंतर संपूर्ण रक्कम तुमच्या एकाच खात्यात दिसते. तुम्ही सोप्या पद्धतीने पीएफ खाते विलीन करु शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या ठिकाणी सेवा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर One Employee One EPF Account वर क्लिक करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

नोंदणीकृत मोबाईलवर येईल ओटीपी यानंतर ईपीएफ खाते विलीन करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर UAN आणि सध्याच्या कर्मचारी क्रमांक टाका. संपूर्ण तपशील जमा केल्यानंतर ओटीपी जनरेट होईल. ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. हा ओटीपी क्रमांक टाकल्यावर तुमच्या जुन्या खात्याची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यानंतर पीएफ खाते क्रमांक टाका आणि सबमिट बटनवर क्लिक करा. खाते विलीन करण्याची तुमची विनंती मान्य होईल. खातरजमा झाल्यानंतर तुमचे खाते मर्ज होईल.

UAN अत्यंत महत्वाचे ईपीएफ संबंधी कोणत्याही सोयी-सुविधांचा ऑनलाईन फायदा उठविण्यासाठी तुम्हाला Universal Account No-UAN माहिती असणे आवश्यक आहे. तसेच हा क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.

असा मिळवा युएएन क्रमांक

  1. सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलला https://epfindia.gov.in/site_en/ भेट द्या.
  2. Services पर्यायावर क्लिक करा
  3. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.
  4. आता Member UAN/online Services वर क्लिक करा
  5. त्यानंतर UAN पोर्टलवर जा.
  6. याठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि
  7. PF Member ID टाकावा लागेल
  8. Get Authorization PIN वर क्लिक करा
  9. PIN क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर पाठवण्यात येईल
  10. आता OTP टाका
  11. Validate OTP टाकून क्लिक करा
  12. तुमचा UAN क्रमांक मिळेल.

नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.