नवीन वर्षात PF चे 5 नियम बदलणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम
EPFO Rules Change: ईपीएफमधील नवीन बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे फायदे होणार आहे. नवीन बदलामुळे पीएफमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. तसेच पीएफ धारक भविष्यात आर्थिक पद्धतीने अधिक सदृढ होतील.
EPFO Rules Change: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीएफसंदर्भात नवीन वर्षांत मोठे बदल होणार आहे. 2025 मध्ये नवीन वर्षांत कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) पीएफमध्ये पाच महत्वाचे बदल करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. या बदलाचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
ईपीएफमधील नवीन बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे फायदे होणार आहे. नवीन बदलामुळे पीएफमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. तसेच पीएफ धारक भविष्यात आर्थिक पद्धतीने अधिक सदृढ होतील. काय आहे हे नवीन बदल…
हे पाच नियम बदलणार
- पीएफमधील या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य आणि निवृत्तीबाबत चांगले परिणाम होणार आहे. EPFO कडून कर्मचाऱ्यांना एक ATM कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य 24 तासांत पैसे काढू शकणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून एटीएममधून पैसे काढता येणार आहे.
- कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ योगदानावरील मर्यादा रद्द करण्यात येणार आहे. सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम दरमहा EPF खात्यात जमा करतात. तथापि, ईपीएफओने निश्चित केलेले 15,000 रुपये वापरण्याऐवजी, सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक पगारानुसार योगदान देण्याच्या विचारात आहे.
- ईपीएफओपरतावा वाढवण्यासाठी पीएफ उत्पन्नाचा काही भाग शेअर्स आणि इतर मालमत्तांमध्ये पुन्हा गुंतवण्याचा विचार करत आहे. त्याची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात केव्हाही होऊ शकते.
- सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ला मंजुरी दिली होती. ज्या अंतर्गत 7.8 दशलक्ष सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन मिळू शकते. हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन तपशील अपलोड करण्याची शेवटची संधी दिली आहे. याव्यतिरिक्त, नियोक्त्यांनी उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी15 जानेवारी 2025 पर्यंत विनंती केली आहे.