PF Deposit: नोकरदारांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात थेट पैसे ट्रान्सफर होणार
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करावी लागते. तोच भाग कंपनीच्यावतीने त्याच खात्यात जमा केला जातो. कंपनी तुमच्या पगारातून पीएफ कापते. तुमचे पीएफचे पैसे वेळेवर ईपीएफओमध्ये जमा करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO-Employees Provident Fund Organisation) 6 कोटींहून अधिक सदस्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. अर्थ मंत्रालयाने 6.5 कोटी खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. EPFO आर्थिक वर्ष 2020-21 साठी EPF सदस्यांच्या खात्यावर 8.5% व्याजाची रक्कम पाठवली आहे. गेल्या वेळी 2019-20 या आर्थिक वर्षात, KYC (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) गडबडीमुळे अनेक ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी 8 ते 10 महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. देशात 6.5 कोटी लोक पीएफच्या कक्षेत येतात.
कामगार मंत्रालयाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 28 ऑक्टोबर रोजी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. आता येत्या आठवडाभरात त्याची अधिसूचना जारी होणार आहे.
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करावी लागते. तोच भाग कंपनीच्यावतीने त्याच खात्यात जमा केला जातो. कंपनी तुमच्या पगारातून पीएफ कापते. तुमचे पीएफचे पैसे वेळेवर ईपीएफओमध्ये जमा करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
घरबसल्या पीएफ कसा चेक कसा कराल?
ईपीएफओ सदस्य ईपीएफ शिल्लक तपासण्यासाठी ईपीएफओकडे नोंदणीकृत त्यांच्या मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवू शकतात. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करा. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल. याशिवाय EPFO कडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करून EPF शिल्लक तपासता करता येईल.
पीएफ चेक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया?
* सर्वप्रथम EPFO वेबसाइट epfindia.gov.in वर जा.
* सेवा विभागात जा आणि कर्मचाऱ्यांसाठी क्लिक करा.
* यानंतर सर्व्हिसेसमधील सदस्य पासबुकवर क्लिक करा.
* UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. नवीन पेजवर तुमचा सदस्य आयडी निवडा.
* View Passbook वर क्लिक करा. यानंतर, येथे तुम्हाला ईपीएफ खात्यातील शिल्लक संबंधित संपूर्ण तपशील मिळतील आणि व्याज देखील पाहू शकाल.
* ईपीएफओचे सदस्य उमंग अॅपवरूनही शिल्लक तपासू शकतात. यासाठी सर्वप्रथम उमंग अॅप उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. Employee Centric Services वर क्लिक करा.
* पासबुक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते भरल्यानंतर, तुम्ही EPF शिल्लक पाहण्यास सक्षम असाल.
इतर बातम्या
Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव
दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव