‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास PF चे पैसे अडकू शकतात, जाणून घ्या प्रॉब्लेम कसा सोडवायचा?

PF Bank Account | प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खाते अपडेट करणे गरजेचे आहे. त्यानंतर EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन नव्या बँकेचा तपशील अपडेट करावा.

'या' बँकेत तुमचं खातं असल्यास PF चे पैसे अडकू शकतात, जाणून घ्या प्रॉब्लेम कसा सोडवायचा?
पीएफ
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 9:50 AM

नवी दिल्ली: सध्या कोरोना संकटामुळे अनेकजण बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर घरी बसण्याची पाळी आली आहे. अशा परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीचे (Provident Fund) पैसे तुमच्या कामी येऊ शकतात. केंद्र सरकारनेही या संकटाच्या प्रसंगात मदतीसाठी EPFO धारकांना अनेक सवलती देऊ केल्या आहेत. (PF Money will stuck if you do not update your bank account after merger)

मात्र, अडीअडचणीच्या प्रसंगात तातडीने पैसे पाहिजे असतील तर तुमचे बँक खाते EPFO ला लिंक असणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेतील केवायसी अपडेट हवेत. तसेच एखादी बँक दुसऱ्या बँकेत मर्ज झाली असेल तर तुमचे खाते अपडेट होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर तुम्हाला PF काढताना अडचणी येऊ शकतात.

एखादी बँक मर्ज झाल्यानंतर तिचे अस्तित्वच संपुष्टात येते. त्यामुळे संबंधित बँकांचे IFSC कोड निरुपयोगी ठरतात. त्यामुळे संबंधित बँकातील EPFO धारकांनी आपली खाती अपडेट करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खाते अपडेट करणे गरजेचे आहे. त्यानंतर EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन नव्या बँकेचा तपशील अपडेट करावा.

कोणत्या बँकांचे IFSC कोड ग्राह्य धरले जाणार नाहीत?

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र बँक (Andhra Bank), सिंडिकेट बँक(Syndicate Bank), ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce), अलाहाबाद बँक (Allahabad Bank), यूनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India), कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank) यांचे IFSC कोड 1 एप्रिल 2021 पासून निरुपयोगी झाले आहेत.

PFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय?

1. EPFO च्या घोषणेनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना EPFO खात्यातून आगाऊ पैसे काढले होते त्यांना आता दुसऱ्यांदा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. EPFO खात्यातील 75 टक्के रक्कम किंवा मूळ वेतन व महागाई भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे पीएफधारकांना खात्यामधून काढता येतील.

3. EPFOच्या ईडीएलआय (EDLI scheme) योजनेतंर्गत विम्याचा लाभ सात लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पीएफधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला सात लाख रुपये मिळतील.

4. EPFO खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.

5. एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतरही तो आपल्या ईपीएफओ खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकतो.

संबंधित बातम्या:

कोरोना बाधितांना मोठा दिलासा, उपचार खर्चावर कर आकारणार नाही, मदतीच्या रकमेवरही मिळेल सूट

पीपीएफ आणि एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी कुठला पर्याय अधिक फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर माहिती

PF Account : कसा काढायचा पेन्शनमध्ये जमा झालेला हिस्सा? या अटी कराव्या लागतील पूर्ण

(PF Money will stuck if you do not update your bank account after merger)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.