PF Deposit: पीएफ खात्यामध्ये अजूनही व्याजाचे पैसे आले नाहीत, जाणून घ्या कुठे तक्रार करायची?

PF Number | Get OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्ही OTP सबमिट करताच, वैयक्तिक तपशील भरल्यानंतर, ज्या पीएफ क्रमांकाशी संबंधित तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पॉप अप येईल.

PF Deposit: पीएफ खात्यामध्ये अजूनही व्याजाचे पैसे आले नाहीत, जाणून घ्या कुठे तक्रार करायची?
पीएफ
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली: सरकारने देशातील करोडो कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर 8.5 टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय, जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता.

पैसे न मिळाल्यास तक्रार कुठे कराल?

यासाठी तुम्हाला https://epfigms.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटला भेट देऊन, तुम्हाला नोंदणी तक्रारीवर क्लिक करावे लागेल. यानंतर पीएफ सदस्य, ईपीएफ पेन्शनर, कंपनी आणि इतर यापैकी योग्य पर्याय निवडा. त्यानंतर पीएफ खात्याशी संबंधित तक्रारीसाठी पीएफ सदस्य निवडा. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, UAN क्रमांक आणि सिक्युरिटी कोड प्रविष्ट करा आणि तपशील मिळवा वर क्लिक करा. UAN शी जोडलेल्या खात्यातून वैयक्तिक माहिती तुम्हाला दिसेल.

त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्ही OTP सबमिट करताच, वैयक्तिक तपशील भरल्यानंतर, ज्या पीएफ क्रमांकाशी संबंधित तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पॉप अप येईल. येथे तुम्हाला पीएफ ऑफिसर, एम्प्लॉयर, एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम किंवा एक्स-पेन्शन या पर्यायातून एक पर्याय निवडावा लागेल. तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर तक्रार नोंदणी क्रमांक येईल.

पीएफ चेक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया?

* सर्वप्रथम EPFO ​​वेबसाइट epfindia.gov.in वर जा.

* सेवा विभागात जा आणि कर्मचाऱ्यांसाठी क्लिक करा.

* यानंतर सर्व्हिसेसमधील सदस्य पासबुकवर क्लिक करा.

* UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. नवीन पेजवर तुमचा सदस्य आयडी निवडा.

* View Passbook वर क्लिक करा. यानंतर, येथे तुम्हाला ईपीएफ खात्यातील शिल्लक संबंधित संपूर्ण तपशील मिळतील आणि व्याज देखील पाहू शकाल.

* ईपीएफओचे सदस्य उमंग अॅपवरूनही शिल्लक तपासू शकतात. यासाठी सर्वप्रथम उमंग अॅप उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. Employee Centric Services वर क्लिक करा.

* पासबुक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते भरल्यानंतर, तुम्ही EPF शिल्लक पाहण्यास सक्षम असाल.

इतर बातम्या

Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.