EPFO : नोकरी सोडली आता PF कसा काढणार?, घाबरु नका! एका दिवसात काढता येणार पीएफ, EPFOचं नव्या प्रणालीवर काम सुरू

कर्मचारी भविष्य निधी संघटना कमीत कमी वेळेत पीएफ काढण्याच्या एका विशेष प्रक्रियेवर काम करत आहे. विशेष म्हणजे या प्रक्रिये अंतर्गत तुम्ही पीएफ काढण्याचा अर्ज दाखल केला की लगेच भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते.

EPFO : नोकरी सोडली आता PF कसा काढणार?, घाबरु नका! एका दिवसात काढता येणार पीएफ,  EPFOचं नव्या प्रणालीवर काम सुरू
EPFOImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 12:03 PM

मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees Provident Fund Organisation’s)कमीत कमी वेळेत पीएफ काढण्याच्या एका विशेष प्रक्रियेवर काम करत आहे. विशेष म्हणजे या प्रक्रिये अंतर्गत तुम्ही पीएफ (PF) काढण्याचा अर्ज दाखल केला की लगेच भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते. सध्याची भविष्य निर्वाह निधीची प्रक्रिया पाहिल्यास पीएफ काढण्यासाठी 3 ते 4 दिवस आणि जवळपास एक आठवड्यापर्यंत कालावधी लागतो. अर्ज दाखल केल्यानंतर त्याला परवानगी मिळणे आणि त्यानंतर ती रक्कम बँक खात्यात (bank account) जमा होईपर्यंत 7 दिवसापर्यंतचाही वेळ लागू शकतो. मात्र, भविष्य निर्वाह निधी संघटना याच प्रक्रियेवर काम करत असून पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत आणखी सुलभता येऊन लवकरात लवकर पीएफची रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते. कारण, पीएफमधून महत्वाच्या कामांसाठी पैसे काढले जातात. विशेष म्हणजे ही तडजोड भविष्यासाठी असते. आता भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यात खूप उशिर न झाल्यास पीएफचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

यापूर्वी PFची प्रक्रिया कशी होती?

भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी सध्याच्या नियमामुसार पैसे काढण्याचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरला जातो. यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) यामध्ये खूप महत्वाचा असतो. अर्ज भरल्यानंतर त्याला मंजुरी मिळते. त्यांतर ते कोणत्याही परिस्थितीत नाकारले देखील जाऊ शकते. पैसे काढण्याची मंजुरी आणि क्रेडिट मिळण्यास बँक किंवा कोणतीही सरकारी सुट्टी असल्यास दोन ते चार दिवसांचा जास्तीचा वेळ लागू शकतो. मात्र आता ही प्रक्रिया सोपी होणार आहे. EPFO पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करणार आहे. क्लेम सेटलमेंटचे काम 24 तासांत पूर्ण करण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे. एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार, भविष्य निर्वाह निधी संघटनेनं एक अशी प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार ड्राफ्ट पेपर तयार करून त्याची मंजुरी घेतली जाईल.

पीएफमधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया

  1. या लिंकवर जा  https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
  2. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.त्यानंतर पडताळणीसाठी कॅप्चा टाका
  3. ‘ऑनलाइन सेवा’ टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘क्लेम (फॉर्म-31, 19 आणि 10 सी)’ पर्याय निवडा
  4. पुढील स्क्रीनवर तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘पडताळणी’ वर क्लिक करा
  5. आता ‘Yes’ वर क्लिक करा आणि पुढे जा
  6.  क्लिक केल्यावर ‘ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा
  7. क्लेम फॉर्ममध्ये, ‘मला अर्ज करायचा आहे’ या टॅबखाली तुम्हाला पाहिजे तो दावा निवडा
  8. त्यानंतर ‘पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)’ निवडा. मग अशा आगाऊपणाचे कारण, रक्कम आणि कर्मचाऱ्याचा पत्ता द्या
  9. आता Certificate वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा
  10. तुम्ही ज्या उद्देशासाठी फॉर्म भरला आहे त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते
  11. कंपनीने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील
  12. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे 15-20 दिवस लागतात
  13. दावे निकाली काढण्यासाठी आणि एकाच दिवसात पैसे हस्तांतरित करण्यासाठी EPFO ​​हा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे.
  14. तासांच्या आत खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

इतर बातम्या

मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फायरिंग

Gadchiroli Naxal | गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 20 लाख रुपयांचे होते बक्षीस

Nashik | नाशिकमध्ये Smart City कडून सुप्रसिद्ध रामकुंड पूल पाडण्याच्या हालचाली; नागरिक आक्रमक

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.