EPFO वर मिळणार 50,000 रुपयांचा बोनस, फक्त ही एक अट असणार

Employees' Provident Fund Organisation: ईपीएफओ खातेधारकांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या ईपीएफ खात्यात सतत आपले योगदान सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्या खातेधारकाने आपली नोकरी बदलली तरी ते खाते सुरु ठेऊन नवीन कंपनीतही EPF मध्ये योगदान सुरु ठेवावे.

EPFO वर मिळणार 50,000 रुपयांचा बोनस, फक्त ही एक अट असणार
ईपीएफओने दिला नोकरदारांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 9:42 AM

कर्मचारी भविष्य निधी संगटन (ईपीएफओ) कडून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची व्यवस्था केली जाते. तसेच नोकरीनंतर दीर्घकाळ सुरक्षा दिली जाते. आता ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. परंतु ईपीएफओच्या नियमाबाबत कर्मचाऱ्यांना जास्त माहिती नसते. त्यात ‘लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिट’ ही तरतूद सर्वांसाठी महत्वाची आहे. EPFO खातेदारास या तरतुदीनुसार 50,000 रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे. त्यासाठी फक्त एकच अट आहे. ही रक्कम मिळण्यासाठी ईपीएफओ खात्यात सलग 20 वर्षे कॉन्ट्रिब्‍यूशन करणे गरजेचे आहे.

फायदा घेण्यासाठी काय आहे पात्रता?

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) कडू ईपीएफ खातेदारकांना ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ बेनिफट देण्याची शिफारस करण्यात आली होती. जे खातेधारक दोन दशके आपल्या खात्यात सलग कॉन्ट्रिब्‍यूशन (योगदान) करणार, त्यांना 50,000 रुपये देण्याची शिफारस CBDT केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केली आहे. यामुळे सलग वीस वर्षे ईपीएफ सुरु ठेवणाऱ्या सर्वांना 50,000 रुपये मिळणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करणाऱ्या संस्थांमध्ये ईपीएफ कपात सक्तीचे असते. कर्मचारी आणि नियुक्ता समसमान वाटा त्यासाठी देत असतो.

हे सुद्धा वाचा

असा मिळणार फायदा

50,000 रुपयांचा फायदा कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर अवलंबून आहे. 5,000 रुपये मूळ वेतन मिळणाऱ्या व्यक्तींना 30,000 रुपये मिळणार आहे. 5,001 रुपये ते 10,000 पर्यंत मूळ वेतन (बेसीक सॅलरी) असणाऱ्यांना 40,000 रुपये मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्या ईपीएफ खातेधारकास 50,000 रुपये मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना काय करावे लागणार

ईपीएफओ खातेधारकांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या ईपीएफ खात्यात सतत आपले योगदान सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्या खातेधारकाने आपली नोकरी बदलली तरी ते खाते सुरु ठेऊन नवीन कंपनीतही EPF मध्ये योगदान सुरु ठेवावे. एकूण वीस वर्षे ईपीएफमध्ये असे योगदान दिल्यानंतर तो 50,000 रुपये बोनस मिळण्यास पात्र होतो. तसेच ईपीएफओ खातेधारकास आपले रिटायरमेंट बेनिफिट वाढवणे आणि लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिट घेता येतो.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.